Tipu Sultan Rally : ईश्वरपूर येथे टिपू सुलतानच्या समर्थनार्थ होणा-या रॅलीला प्रशासनाने परवानगी दिली तर...

  403

कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास पोलीस प्रशासनाला धरणार जबाबदार : सकल हिंदू समाज


इस्लामपूर : इंग्रजांनी बनवलेल्या तत्कालीन म्हैसूर भौगोलिक स्थळ- वर्णनकोशामध्ये (म्हैसूर गॅझेटियरमध्ये) टिपू सुलतानने त्या काळी दक्षिण भारतातील ८ सहस्त्रांपेक्षाही जास्त देवळे नष्ट केली होती, अशी नोंद इतिहासात आहे. यातील अधिक देवळे तर केरळमधील मलबार आणि कोची येथील होती. इतिहासात क्रूरकर्मा म्हणून नोंद असणा-या टिपू सुलतानच्या समर्थनार्थ २० नोव्हेंबर रोजी ईश्वरपूर येथे रॅली काढण्यात येणार आहे. या बाबत स्थानिक काही मुस्लिम लोक याबाबत जोरदार तयारी चालू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.


टिपूच्या हाती सत्ता येताच त्याने मूळच्या हिंदू राजाचे नांव गाव पुसून टाकले. म्हैसूर हे इस्लामी राज्य असल्याचे घोषित केले. या स्वतंत्र इस्लामी राज्याचे आम्ही सुलतान आहोत अशी व्दाही फिरवली. एवढेच नाही, तर आपल्या राज्यातल्या सर्व काफिरांना (मुसलमान सोडून इतरांना म्हणजे हिंदूंना) धर्मांतरित करून मुसलमान करून घेईन, अशी प्रतिज्ञा घेतली. आपल्या प्रतिज्ञेची पूर्तता करण्यासाठी त्याने आपल्या राज्यातल्या सर्व हिंदूना मुसलमान होण्याची आज्ञा केली. म्हैसूरमधल्या गावागावांतील मुसलमान अधिका-यांना लेखी आदेश पाठवले, 'सर्व हिंदु स्त्री पुरूषांना मुसलमान धर्माची दिक्षा द्या. जे स्वेच्छेने पोलीस निरीक्षक इस्लामपूर पोलीस ठाणे मुसलमान धर्माचा स्विकार करणार नाहीत, त्यांना बळजबरीने मुसलमान करा अथवा ठार मारा. हिंदू स्त्रियांना पकडून आणा आणि बटीक करून सर्व मुसलमानांमध्ये वाटून टाका. त्यामुळे अशा हिंदू विरोधी आणि राष्ट्र विरोधी टिपूच्या समर्थनार्थ निघणारी रॅलीची परवानगी त्वरीत रद्द करण्यात यावी असे निवेदन स्थानिक सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिले.


टिपूच्या सैन्याने ऑगस्ट १७८६ मध्ये प्रसिध्द पेरूमनम् देवळातील सर्व मूर्तीची तोडफोड केली. त्यापुढे त्रिश्शिवपेरूरपासून करूवन्नूर नदीपर्यंत असलेल्या सर्व देवळांमधील मूर्ती नष्ट केल्या. टिपूने मम्मीयूर शिव मंदिर आणि अन्य दोन श्रीकृष्णाची देवळे नष्ट केल्यानंतर गुरूवायूर देवळावर आक्रमण करून ते देऊळ उद्ध्वस्त केले होते. अंगाडिप्पुरम् येथील ४ सहस वर्षापुर्वीचे नरसिंहमूर्ती देऊळ टिपूच्या सैन्याने नष्ट केले. टिपूच्या अत्याचारी राजवटीत तरूण मुलींचा अमानुष छळ करून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आले. सुंदर आणि तरूण राजरित्रयांना टिपूने खतःच्या जनानखान्यात बंदिस्त केले. त्रावणकोरच्या हिंदू राजाची हत्या करून टिपूने त्याचे प्रेत हत्तीच्या पायास बांधून त्याची धिंड काढली. गोहत्या करणारी आणि मंदिरांची तोडफोड करणारी टिपूचे माणसे सरसकट गोहत्या करायची. एवढेच नव्हे, तर देवळातील मूर्तीची तोडफोड करून त्याच ठिकाणी गोहत्या करायचे आणि नंतर तिथे मशीद बांधायचे. ब-याचदा मूर्तीचे तुकडे करून त्यापासून मशिदच्या पाय-या बनवल्या जात, जेणेकरून श्रध्दाळू आणि शांतीचे पूजक म्हणवणा-या मुसलमानांना त्यांच्यावर पाय देऊन नमाजासाठी जाता येईल.


अशा क्रूरकर्मा टिपूच्या समर्थनार्थ रॅली म्हणजे हिंदूच्या धर्म भावनांवर मिठ चोळल्यासारखे होईल. याच समवेत अशा अत्याचारी शासकाचा आदर्श समाजासमोर आणि भावी पिढीसमोर ठेवून या रॅलीतून काय साध्य करायचे आहे, याचाही विचार करून अशा प्रकारच्या काढण्यात येणा-या रॅलीचा निर्णय आपण त्वरित रद्द करावा अशी मागणी सकल हिंदू समाजाकडून करण्यात आली आहे. तसेच भारतीय दंड विधान १५३ ए, २९५ अ प्रमाणे आमच्या धार्मिक भावना दुखविण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. सदरच्या रॅलीची संबंधीत आयोजकांनी पोलिस परवानगी घेतली आहे का? याची चौकशी व्हावी, तशी परवानगी जर दिली गेली असेल तर सामाजिक शांतताही धोक्यात येवू शकते त्यामुळे ती त्वरीत रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे. आणि जर सदर रॅली गावातून निघाल्यास संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली या घडणाऱ्या गोष्टीला स्थानिक पोलीस प्रशासन जबाबदार असेल निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे पोलीस सदर रॅलीला परवानगी देणार का याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Comments
Add Comment

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये