शिक्षक-मुख्याध्यापकांच्या विविध समस्या प्राधान्याने सोडविणार : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

  346

कोल्हापूर : माध्यमिक शाळा शिक्षक- मुख्याध्यापकांच्या विविध समस्या प्राधान्याने सोडविणार असे उद्गार महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज कोल्हापूर येथे शिक्षक संघाच्या अधिवेशनात काढले. शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करणार, टप्प्यावरील शाळांना ११६० कोटी रु दिले ते कमी पडतात अजुन अनुदान ३० डिसेंबर पर्यंत वाढून देऊन सर्वांनाच अनुदान देणार, ज्यु कॉलेजच्या शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न नुकताच मार्गी लावला आहे. नर्सरी ते ज्युनिअर - सिनिअर केजी पर्यंत सत्तर हजार, शाळा जुन पासुन नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे सुरु करणार , माध्यमिक शाळांना शासकीय दर्जा देवून ३५००० शाळेतील मुलांना गणवेश देणार , महाराष्ट्रातील शाळांना CSR निधी देवुन गुणवत्ता सुधारणार यात संस्था चालकांचे अधिकार कमी होऊ देणार नाही . प्राथमिक शाळांसाठी कला, क्रीडा शिक्षक भरणार, ५ डिसेंबर पासुन स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रम राबवुन बक्षीसे देणार , देशात चांगले वैज्ञानिक घडावे म्हणुन वाचन संस्कृती वाढवणार . व मोफत वाचनालये देणार, संच मान्यता डिसेंबर पर्यंत पुर्ण करून जानेवारीत कमी झालेली पदे पुन्हा देणार . अनुदानाचा पुढील टप्पा जानेवारीत देणार , मुलांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी मोफत वहया पुस्तके देतो स्वाध्यायावर मर्यादा आणा देणगी स्वरूपात वह्या पुस्तके घेऊ नका. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे त्वरित भरणार, शिक्षकांची पदे पवित्र पोर्टल नुसार तीनास एक असे भरणार या साठी रोस्टर तपासणी करून घ्या शिक्षकांची ३० हजार पदे भरणार आहे . जुनी पेन्शन योजना लागु करणार आहे पण शिक्षकांना त्यांचे Contributin भरावेच लागेल. महाराष्ट्रात शिक्षणाची परिस्थिती फारशी चांगली नाही . महाराष्ट्र हे कल्याणकारी राज्य असुन शैक्षणिक आलेख उंचवण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर आहे, असे ते म्हणाले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल महाराष्ट्र मध्य उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब आवारी तर संमेलन अध्यक्ष खंडेराव जगदाळे, स्वागत अध्यक्ष घोडावाड युनिव्हर्सिटीचे संस्थापक संजय घोडावत, आमदार आजगावकर, माजी आमदार भगवान सोळंके पाटील प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.


आपल्या प्रास्ताविक भाषणात मुख्याध्यापक संघाचे राज्य अध्यक्ष केरूभाऊ ढोमसे यांनी मुख्याध्यापक संघाने केलेल्या कार्याचा लेखाजोखा पाहुण्यांच्या समोर ठेवला व विविध मुख्याध्यापकांना येणाऱ्या समस्या मांडल्या. याप्रसंगी पाहुण्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. आपल्या भाषणात संजय घोडावत यांनी मुख्याध्यापक हा अतिशय महत्त्वाचा शाळेचा भाग असून मुख्याध्यापकांनी आपली शाळा प्रगती पथावर येण्यासाठी कार्य तत्पर असले पाहिजे असे सांगितले तर शिक्षक आमदार जयंत आसगांवकर यांनी मुख्याध्यापकांच्या सर्व समस्यांची मला जाण आहे मी यासाठी लढत राहील असे सांगितले . माजी आरोग्य मंत्री आमदार राजेन्द्र एड्रागांवकर यांनी येणाऱ्या अधिवेशनात आपले प्रश्न प्रामुख्याने मांडणार असे सांगितले. यावेळी अधिवेशनासाठी पश्चिम महाराष्ट्र , विदर्भ , मराठवाड्यामधुन ४००० मुख्याध्यापक हजर होते . नाशिक मधुन सचिव एस . बी . देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ६५ मुख्याध्यापक हजर होते. यात एच आर जाधव , डॉ. अनिल माळी , बी .के .शेवाळे, डी .एस . ठाकरे, आर . पी. गायकवाड, बाळासाहेब ढोबळे, एस . आर . गायकवाड, गोरख कुलधर , संजय शेळके, रमेश पठाडे यांच्यासह मोठ्या संख्येने मुख्याध्यापक हजर होते.

Comments
Add Comment

चोपदाराच्या उद्धटपणामुळे वारीतील स्नेहभाव, प्रेमबंध, सेवाभावाला गालबोट

वारकरी महिलेला जोरात ढकलून दिल्याचा व्हिडीओ व्हायरल सोलापूर : राज्यात सर्वत्र पंढरीच्या वारीचा उत्साह पाहायला

एकाच महिन्यात ९ लाख लाडक्या बहिणींचा प्रवास

विरार (प्रतिनिधी) : महापालिकेच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेत महिलांना

शाडूच्या मूर्तीना भक्तांकडून पसंती

चिपळूण (वार्ताहर): मुंबई उच्च न्यायालयानेही पीओपी गणेशमूर्ती तयार करण्यावर सुरुवातीला बंदी आणली होती. चिपळूण

प्रत्येकाला विश्वासात घेऊनच शक्तिपीठ महामार्ग होणार - नितेश राणे

महामार्गाचा सध्याचा प्लॅन १०० टक्के बदलणार पालकमंत्री म्हणून प्रत्येकाशी संवाद साधण्यास मी तयार सिंधुदुर्ग :

कुरियरवाला असल्याचे सांगत तरुणीवर बलात्कार प्रकरणी, पोलिसांना तात्काळ कारवाईचे निर्देश

सोसायट्यांसाठी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसह नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन  पुणे: कोंढवा

कन्नड तहसील कार्यालयासमोरची नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात ठिकठिकाणी सतत पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक जुनं बांधकाम असलेल्या इमारतींची