नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालयांनी शुक्रवारी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या दरम्यान केजरीवाल यांनी सांगितले की आपली संघटना आणि कार्यकर्ते ही आम आदमी पक्षाची मोठी ताकद आहे. या निमित्ताने त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधता सांगितले की जेलमध्ये पाठवण्याचा प्लान बनवला आहे.
केजरीवाल म्हणाले, आम्ही लोक तुरुंगात जाण्याला घाबरत नाही. मी एकदा १५ दिवस जेलमध्ये राहिलो आहे. आत ठीक व्यवस्था असते. यासाठी जेलमध्ये जाण्यापासून आप घाबरत नाही. जर भगत सिंह इतके दिवस जेलमध्ये राहू शकतात. मनीष सिसोदिया ९ महिने जेलमध्ये राहू शकतात. सत्येंद्र जैन एक वर्षे जेलमध्ये राहू शकतात तर आम्ही जेलमध्ये जायला घाबरत नाही.
केजरीवाल पुढे म्हणाले, आम्हाला सत्तेची लालसा नाही. ४९ दिवसांनी राजीनामा दिला होता. आपल्या चौकीदाराच्या नोकरीचा राजीनामा देत नाही. माझ्या मते मी जगातील पहिला मुख्यमंत्री आहे ज्याने आपल्या मर्जीने ४९ दिवसांनी राजीनामा दिला होता. मुख्यमंत्र्याला खुर्चीची लालसा नाही. मला राजीनामा दिला पाहिजे की जेलमधून सरकार चालवले पाहिजे याबाबत विविध लोकांशी मी चर्चा करत आहे.
मुख्यमंत्री आपच्या कार्यकर्त्यांना म्हणाले, दिल्लीच्या जनतेने आम्हाला खूप प्रेम दिले. दिल्लीच्या जनतेने आम्हाला खूप प्रेम दिले. दिल्लीच्या जनतेच्या मर्जीशिवाय आम्ही काही करणार नाही.
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…