Nana Patekar Fan Viral Video : नानांनी माफी मागितली पण चापट खाल्लेला फॅन म्हणतो 'माझी इज्जत गेली...

त्या फॅनने व्यक्त केल्या भावना


उत्तरप्रदेश : दोन दिवसांपूर्वी नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी शूटिंग सुरु असताना सेल्फी काढायला आलेल्या एका फॅनला चापट मारल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला होता. त्यामुळे चाहत्यांनी नानांना बरंच ट्रोल केलं. या प्रकरणी शूट सुरु असलेल्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने तो सीनचाच एक भाग असल्याचे सांगितले. तर नानांनी देखील एक व्हिडीओ पोस्ट करत घडलेला घटनाक्रम सांगितला. चापट खाल्लेला फॅन हा क्रू मेंबरपैकीच असावा असं वाटल्याने नानांनी जी रिहर्सल केली होती त्यानुसार त्या फॅनला चापट मारली. नानांनी या व्हिडीओमध्ये सर्व चाहत्यांची माफी देखील मागितली आहे.


यानंतर आता चापट खाल्लेल्या फॅनने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नानांनी म्हणतायत त्याप्रमाणे आपल्याला पुन्हा बोलावलं वगैरे नाही असं त्याने सांगितलं आहे. तो म्हणाला, 'घाटावर चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे की नाही किंवा कोणी सेलिब्रिटी तेथे आहे की नाही याची मला कल्पना नव्हती. मी नेहमीप्रमाणे घाटावर आंघोळीसाठी गेलो होतो. जेव्हा मला समजले की, जवळच नाना पाटेकर यांच्या एका चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. त्यानंतर मी नाना पाटेकर यांच्याकडे गेलो. तिथल्या बाऊन्सरने मला थांबवण्याचा प्रयत्न केला पण मी कसाबसा त्यांच्याजवळ गेलो.


नाना पाटेकर आपल्या व्हिडीओमध्ये म्हणाले होते की, 'मला वाटले की तो आमच्या क्रूपैकी एक आहे, म्हणून मी त्याला रिहर्सलनुसार त्याला मारलं आणि त्याला निघून जाण्यास सांगितले. नंतर मला कळले की तो क्रूचा भाग नव्हता, म्हणून मी त्याला परत बोलावले, पण तो पळून गेला'. याबाबत त्या फॅनला प्रश्न केला असता त्याने मात्र वेगळाच खुलासा केला. तो म्हणाला, 'मी सेल्फी घ्यायला जाणार तोच नानांनी मला चापट मारली आणि मला बाऊन्सरने बाहेर काढलं. माझ्या विभागात सर्वांना ही घटना समजली असल्याने माझी इज्जत गेली आहे. याशिवाय नाना पाटेकर यांनी मारल्यावर मला परत बोलावलं, ते सर्व खोटं आहे. असं काही घडलंच नाही'.



नानांवर पोलीस कारवाई करणार का? असा प्रश्न विचारताच फॅनने नकार दिला. दरम्यान, नाना पाटेकर म्हणाले, 'मी कधीही कोणाला फोटो काढण्यास नकार दिला नाही. मी असे कधीच केले नसते. जे काही झाले ते चुकून झाले. काही गैरसमजांमुळे हे घडले. मला क्षमा करा. मी पुन्हा असं कधीच करणार नाही' अशी नानांनी व्हिडीओमध्ये माफी मागितली आहे.

Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी