Monday, May 12, 2025

क्रीडामहत्वाची बातमी

world cup 2023: विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत-ऑस्ट्रेलिया असणार आमनेसामने

world cup 2023: विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत-ऑस्ट्रेलिया असणार आमनेसामने

कोलकाता: विश्वचषक २०२३च्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला हरवत शानदार पद्धतीने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना २१२ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २१३ धावांचे आव्हान ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान १६ बॉल राखत पूर्ण केले.


२०२३च्या वर्ल्डकपच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला तीन विकेटनी हरवले. आफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना डेविड मिलरच्या शतकी खेळीच्या जोरावर २१२ धावा केल्या होत्या. हा सामना अतिशय रोमहर्षक ठरला. यात रोमहर्षक सामन्यात आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा चोकर्स ठरला. त्यांनी हा सामना ३ विकेटनी गमावला.


आता हा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाच्या संघाने फायनलमध्ये बाजी मारली आहे. आता अंतिम सामन्याचा मुकाबला १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. या सामन्यात कांगारूंची टक्कर भारतीय संघाशी होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ ८व्यांदा फायनल खेळण्यासाठी उतरणार आहे तर भारतीय संघाचा हा चौथा खिताबी सामना असेल.



ऑफ्रिकेविरुद्ध जिंकताना ऑस्ट्रेलियाला सुटला घाम


या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २१३ धावांचे आव्हान ठेवले होते. याच्या प्रत्युत्तरात कांगारूच्या संघाने ७ विकेट गमावत ४७.२ षटकांत हा सामना जिंकला. दरम्यान, आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी चांगलाच घाम आणला. कारण आफ्रिकेने १७४ धावांत त्यांचे ६ विकेट काढले होते.

Comments
Add Comment