Gondavalekar Maharaj : अभिमान जाणे ही देवाची कृपाच


  • अध्यात्म : ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज


आता उत्सव पुरा झाला. आता तुम्ही सर्वजण परत जाल, तर क्षेत्रात आल्याची काही खूण घेऊन जा. ती खूण म्हणजे काय? क्षेत्राच्या ठिकाणी काहीतरी अवगुण सोडावा; आपल्याला जी काही प्रिय वस्तू असते ती सोडावी. तर इथे येऊन, विषयांपैकी एखादा विषय तरी तुम्ही सोडाल का? इथे साक्षात परमात्मा आले आहेत, त्यांचे तुम्हा सर्वांना दर्शन झाले आहे, तर मला वाटते याहून तुम्ही काही तरी जास्त करणे आवश्यक आहे. एक गोष्ट इथे द्यावी आणि एक गोष्ट इथून घेऊन जावी - अभिमान इथे सोडावा आणि त्या बदली देवाची कृपा घेऊन जावी. अभिमान तुम्हाला देता येईल का? अभिमान ही उचलून देण्यासारखी वस्तू आहे का? अभिमान जाणे म्हणजेच देवाची कृपा होणे आहे. अभिमान सोडू म्हणून सुटत नाही.



एकदा, एकजण ३ वर्षांपर्यंत एके ठिकाणी बसून सारखे साधन करीत होता. मी एके ठिकाणी सारखे बसून साधन करतो आहे असे त्याला वाटत असे. एकदा त्याचे गुरू तिथून जात होते. त्याला साधनाचा अभिमान झाला आहे असे त्यांना ताबडतोब समजले. म्हणून ते त्याच्याजवळ जाऊन म्हणाले की, “तू इथे काय करतो आहेस?” तर तो म्हणाला, “मी इथे एके ठिकाणी बसून तीन वर्षे साधना करतो आहे.” ते म्हणाले, “वा! वा! फार चांगले! तू आणखी तीनच दिवस इथे सारखे बसून साधन कर, म्हणजे आतापर्यंत केलेल्याचे श्रेय मिळेल.” तो तसे करू लागला. त्याला वाटले की, ३ वर्षे साधन केले, तर आता ३ दिवस करणे फारसे काय अवघड आहे, ते तर सहज करीन! पण गंमत अशी की, त्याला गुरूने सांगितल्यावर तिथे ५ मिनिटेसुद्धा बसवले नाही. त्याला आतून कोणीतरी फेकून देते आहे, असे वाटू लागले आणि आजूबाजूने सारखी भीती वाटू लागली, तेव्हा आपली चूक त्याच्या ध्यानात आली. तो गुरूला शरण गेला. तो म्हणाला, “मी आजपर्यंत अभिमानाने साधन केले, पण आपण करून घेतल्याशिवाय हे काही सुरळीत घडणे शक्य नव्हते. आपणच माझ्याकडून सर्व करून घेतले म्हणून माझ्याकडून हे साधन झाले.” याप्रमाणे शरण गेल्यावर त्याला गुरुकृपा झाली. म्हणून सात्त्विक अभिमानही उपयोगी नाही. एकवेळ प्रपंचाचा अभिमान पत्करतो, कारण तो लवकर जातो. पण सात्त्विक अभिमान सुटायला वेळ लागतो. परमार्थामध्ये मिळविण्यापेक्षा मिळविलेले टिकवणे हेच फार कठीण जाते.

Comments
Add Comment

समर्थ रामदास

आधी प्रपंच करावा नेटका आधी प्रपंच कराना नेटका। मग घ्यावे परमार्थ विवेका। येथे आळस करू नका । विवेकी हो ।। दासबोधः

संत एकनाथ

वारियाने कुंडल हाले वारियाने कुडल हाले । डोळे मोडित राधा चाले ।। राधेला पाहुनि भुलले हरी । बैल दुभवी नंदाघरी

संत ज्ञानेश्वर

आणि इच्छिलिया सांगडे आणि इच्छिलिया सांगडे | इंद्रिया आमिष न जोडे | ऐसा जो ठावे पडे | तोचि

संत तुकाराम

डॉ. देवीदास पोटे हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा । चित्त शुद्धी सेवा देवाची हे ॥१॥ आवडी

समर्थ रामदास

- डॉ. देवीदास पोटे पेरिले ते उगवते पेरिले ते उगवते। बोलल्यासारिखे उत्तर येते। तरी मग कर्कश बोलावे ते। काय

अंधारातून प्रकाशाकडे

सद्गुरू वामनराव पै, जीवन संगीत । भाग ५ सध्या समाजामध्ये अनेक गैरसमज मोठ्या प्रमाणात पसरलेले आहेत. "आपल्या हातात