Health: तुम्ही ७ तासांपेक्षा कमी झोपता का? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी

मुंबई: आजकालच्या धकाधकीच्या जीवनामुळे लोकांना झोपायलाही पुरेसा वेळ मिळत नाही आहे. आपल्या शरीरासाठी पुरेशी झोप गरजेची असते. यामुळे डोके शांत राहते. पाचनक्रिया तंदुरुस्त राहते. सोबतच रोगप्रतिकारक क्षमताही वाढते. झोपेच्या कमतरतेमुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. आरोग्य तज्ञांच्या मते प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी ७ ते ९ तासांची झोप गरजेची असते. आपल्या निरोगी आरोग्यासाठी हे गरजेचे असते.



का गरजेची आहे ७ तासांची झोप?


७ तासादरम्यान तुमचे शरीर रिपेअर मोडमध्ये जाते. या दरम्यान तुमचे स्नायू तसेच मसल्सयांची पुर्ननिर्मिती होती.यामुळे ताजेतवाने होते. मेंदूसाठीही पुरेशी झोप घेणे गरजेचे असते. यामुळे मेंदूला पुन्हा एनर्जी मिळते.


थकवा - जर तुम्ही ७ तासांपेक्षा कमी झोपत आहात तर तुमचे शरीर नेहमी थकलेले असू शकते. तसेच संपूर्ण दिवस हा थकवा राहतो. सकाळी उठल्यानंतरही तुम्हाला फ्रेश वाटत नाही. यामुळे एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे कठीण होते.


वजन वाढणे - झोप आणि वजनाचा खूप खोल संबंध आहे. पुरेशी झोप न घेतल्याने शरीरात दोन हार्मोन्स ग्रेलिन आणि लेप्टिनचे संतुलन बिघडते. ग्रेलिन हार्मोन भुकेला उत्तेजित करते.तर लेप्टिन हार्मोन पोट भरल्याचे संकेत देतात.


मानसिक स्थितीवर परिणाम - कमी झोपल्याने त्याचा सरळ परिणाम मानसिक स्थितीवर होते. जेवढा वेळ आपण झोपतो तेवढा आपला मेंदू रिफ्रेश होतो. मात्र झोप पूर्ण न झाल्याने मेंदू फ्रेश होते नाही. यामुळे मानसिक समस्या जाणवता.


हार्ट अॅटॅक - जेव्हा आपण झोपतो तेव्हा शरीर रिपेअर होत असते मात्र झोप पूर्ण न झाल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जात नाहीत. यामुळे ब्लड प्रेशरचा धोका वाढतो. यामुळे हार्ट अॅटॅक येण्याचा धोका असतो.

Comments
Add Comment

बेस्ट भरती करणार ५०० वाहक

मुंबई : दिवसेंदिवस कमी होत चाललेली कर्मचाऱ्यांची संख्या व सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांवर येणारा अतिरिक्त ताण

आयआयटी मुंबईत पहिल्या वर्षासाठी मानसिक आरोग्य अभ्यासक्रम अनिवार्य

मानसिक आरोग्यावर आधारीत अभ्यासक्रम लावणारा मुंबई आयआयटी पहिलाच मुंबई : आयआयटी मुंबईने आपल्या पहिल्या वर्षातील

वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमचे १९-२० डिसेंबरला मुंबईत आयोजन

जगभरातील अग्रणी उद्योगपती, व्यावसायिक आणि विचारवंत यांना एकत्र आणणारे व्यासपीठ मुंबई : वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक

अंधेरी एमआयडीसीमध्ये रासायनिक गळती

एकाचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर मुंबई : अंधेरी (पूर्व) येथील एमआयडीसी परिसरातील भंगारवाडी येथे शनिवारी

शीळफाटा येथे उड्डाणपुलाच्या कामानिमित्त निळजे-दातिवलीदरम्यान ब्लॉक

मुंबई : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन प्रकल्पासाठी शीळ फाटा येथील उड्डाणपूल हटविण्याच्या कामासाठी,

मुंबईतील धूर ओकणाऱ्या कारखान्यांना टाळे बसणार

वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती मुंबई : मुंबईतील वाढलेली प्रदूषणाची मात्रा कमी