Murder: उधारीचे २०० रूपये परत मागितल्याने केली तरूणाची हत्या, तिघांना अटक, दोन फरार

Share

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये एका तरूणाच्या हत्येचे प्रकरण समोर आलेआहे. ही हत्या केवळ २०० रूपयांसाठी करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी पोहोचली आणि मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला. या घटनेनंतर मृत तरूणाच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ही घटना नगलापान सहाय येथील आहे. येथे राहणाऱ्या कमलेशने ओळखीच्या भूपेंद्रला २०० रूपये उधार दिले होते. बऱ्याच दिवसांपासून तो भूपेंद्रकडे पैसे मागत होता. मात्र भूपेंद्र काही पैसे परत करत नव्हता. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यादरम्यान शिवीगाळ झाली तसेच मारझोडही झाली. यानंतर कमलेशने बदला घेण्यासाठी आपल्या ५ साथीदारांसह भूपेंद्रला धडा शिकवण्याचा प्लान बनवला.

उधारीचे २०० रूपये मागण्यावरून झाली हत्या

९ नोव्हेंबरच्या रात्री जेवायला म्हणून भूपेंद्रला एकट्याला बोलावले. त्याला तेथे दारू पाजण्यात आली. त्यानंतर ५ मित्रांसह मिळून त्याची हत्या करून त्याचा मृतदेह झाडीत फेकण्यात आला. पोलिसांनी या हत्येचा खुलासा करताना दीवान सिंह, विजय आणि मनोज यांना अठक केली. याशिवाय यातील दोन अन्य आरोपी फरार आहेत.

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

1 hour ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

1 hour ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

1 hour ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

1 hour ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

1 hour ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

1 hour ago