मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने(team india) आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या(icc cricket world cup 2023) सेमीफायनलमध्ये अतिशय शानदार पद्धतीने आपले स्थान बनवले आहे. स्पर्धेत खेळवल्या गेलेल्या ९ पैकी ९ सामन्यांत भारताने विजय मिळवला. टीम इंडियाचा आता सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सामना रंगणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना रंगणार आहे. या सामन्याच्या आधी एअरपोर्टवर पोहोचलेल्या विराट कोहलीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
भारतात खेळवल्या जात असलेल्या आयसीसी वनडे वर्ल्डकपआधी पहिल्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाचा सामना गेल्या वेळचा उपविजेता न्यूझीलंड संघाशी होणार आहे. भारताने बंगळुरूमध्ये नेदरलँड्सविरुद्ध शेवटचा लीग सामना खेळला होता. टीम इंडियाचे हे क्रिकेटर मुंबईत पोहोचले आहेत. येथे एअरपोर्टवर पोहोचताच विराट कोहलीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओत अनेक कॅमेरा पर्सन फोटो घेण्यासाठी आग्रह करत होते. त्यांचे म्हणणे होते की गाडीजवळ कोणीही फोटो घेणार नाही.
विराट कोहलीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या सेमीफायनलआधीचा हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. जो व्हिडिओ समोर आला आहे त्यात विराट थोडा भडकलेला दिसत आहे. सगळ्यात आधी तर सकाळची वेळ आहे आणि त्याला घरी पोहोचायचे आहे. त्यावेळी विराटने सांगितले की फोटो येथे घ्या कारकडे जाण्याची गरज नाही. फोटोसाठी जबरदस्ती केल्याने विराट भडकला आणि त्याने सांगितले की फोटो लवकरच घ्या मुलीला घरी जायचे आहे लवकर करा मी थांबू शकणार नाही.
निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…
गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…