World cup 2023: भारताने नेदरलँड्सविरुद्ध साजरी केली विजयाची दिवाळी

बंगळुरू: टीम इंडियाने(team india) विश्वचषक २०२३मध्ये(world cup 2023) नेदरलँड्सविरुद्ध जबरदस्त खेळ करताना सलग नववा सामना जिंकत दिवाळीला मोठे गिफ्ट दिले आहे. टीम इंडियाने हा सामना तब्बल १६० धावांनी जिंकला. टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ४ बाद ४१० धावा केल्या. त्यानंतर नेदरलँड्सचा संघ २५० धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.


सेमीफायनलमध्ये भारत आता न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळणार आहे. १५ नोव्हेंबरला हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये रंगणार आहे. टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीसाठी उथरलेल्या भारतीय संघाने चार बाद ४१० इतका मोठा स्कोर उभा केला. भारतीय संघाच्या फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी शतकी खेळी केल्या. रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी अर्धशतके ठोकली.


श्रेयसने ९४ बॉलमध्ये नाबाद १२८ धावा केल्या. यात त्याने १० चौकार आणि पाच षटकार सामील होते. केएल राहुलने ११ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ६४ बॉलमध्ये १०२ धावांची खेळी केली. राहुल आणि श्रेयस अय्यरने चौथ्या विकेटसाठी २०८ धावांची भागीदारी केली.


भारताकडून आज ९ गोलंदाजांना संधी देण्यात आली. यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत