Virushka Baby : विरुष्काची गुडन्यूज खरी? दिसून आलं बेबीबंप...

वामिकाला मिळणार भाऊ की बहीण? 'त्या' व्हायरल व्हिडीओमुळे नेटकर्‍यांच्या चर्चेला उधाण...


बंगळुरु : गेल्या काही दिवसांपासून भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आपल्या घरी नव्या पाहुण्याचं स्वागत करणार आहेत, अशा चर्चा रंगल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी पॅपराझींनी (Paparazzi) या जोडप्याला एका मॅटर्निटी क्लिनिकबाहेर (Maternity clinic) स्पॉट केलं होतं. तेव्हा फोटो क्लिक न करण्याची विनंती करत आम्ही लवकरच याबाबत घोषणा करु असं दोघंही म्हणाले होते. तेव्हापासून या चर्चेला उधाण आलं आहे. त्यातच आता बंगळुरु (Banglore) येथे हे जोडपं पुन्हा स्पॉट झालं आणि याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात अनुष्काचं बेबी बंप (Baby Bump) दिसत आहे, अशा प्रतिक्रिया नेटकर्‍यांकडून येत आहेत.


अनुष्का शर्माचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media viral) वाऱ्यासारखा पसरला आहे. व्हिडीओत अनुष्का आणि विराट यांच्या आसपास सिक्युरीटी गार्ड दिसत आहेत. दोघंही एकमेकांचे हात पकडून चालतायत. अनुष्काने बलून स्लीव्हसह काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. पोटावर हात ठेवून अनुष्काने तिचा बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न केला आहे, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.





'लवकरच ज्युनिअर विराट येणार', 'अनुष्का प्रेग्नंट आहे का?' अशा कमेंट्स या व्हिडीओखाली येत आहेत. तर काहींनी मात्र विरोधी भूमिका घेतली आहे. 'अनुष्का आणि विराटचं ते खाजगी आयुष्य आहे, त्यांना एकटं राहू द्या', 'एखाद्याच्या गरोदरपणाचा एवढा का बाऊ करायचा?', अशा कमेंट्सही नेटकरी करत आहेत.


विराट आणि अनुष्काने २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. २०२१ मध्ये त्यांनी मुलीला जन्म दिला. तिचं नाव 'वामिका' आहे. अनुष्का ही बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असते, तर विराटचा नुकताच बर्थडे झाला असून या दिवशी त्याने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. यानंतर आता हे दोघं पुन्हा काही गोड बातमी देणार का याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. विरुष्काने मात्र याबाबत अजून कोणतीही माहिती दिली नाही.

Comments
Add Comment

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना