
संजय राऊत हा नेमका कोणाचा पोपट?
आमदार नितेश राणे यांची सणसणीत टीका
मुंबई : आज सकाळी बोलताना संजय राजाराम राऊतने (Sanjay Raut) भारतीय जनता पक्ष ही एक सेल्फिश पार्टी आहे असा उल्लेख केला. त्याला मी आठवण करुन देईन की भारतीय जनता पक्ष (Bhartiya Janata Party) ही एक सेल्फलेस पार्टी आहे. देशासाठी स्वतःचा विचार न करणारा राष्ट्रभक्तांचा पक्ष म्हणजे भाजप. पण संजय राऊतचा उबाठा (Ubatha) ही एक सेक्सिस्ट पार्टी आहे. महिलांवर पुरुषार्थ गाजवणं, महिलांना कमी लेखणं याची असंख्य उदाहरणं उबाठाच्या प्रमुखांकडून, त्याच्या मुलाकडून, त्याच्या कामगाराकडून ते सगळीकडेच आपल्याला पाहायला मिळतील. महिलांचा छळ करणं हा एककलमी कार्यक्रम उबाठाचा राहिलेला आहे, अशी सणसणीत टीका भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली.
नितेश राणे म्हणाले, पाकिस्तानच्या लोकांनाही माहित आहे की शिवसेना ही ठाकरेंची आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात जर पाकिस्तानमध्ये कोणी जाऊन विचारलं असतं तर तेव्हा हे म्हटलं असतं की, महाराष्ट्र में जो शिवसेना पार्टी है, वह शेर बालासाहेब ठाकरे की पार्टी है'. पण आता जर तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन विचाराल तर ते दाढी कुरवाळत तुम्हाला बोलतील की, 'महाराष्ट्र में उद्धव बालासाहेब ठाकरे की जो पार्टी है, वह हमारे मुल्ला उद्धव की पार्टी है'. आधी बाळासाहेबांचं नाव घेतलं तर पाकिस्तानमधील लोकं थरथर कापायची. त्या शिवसेनेमध्ये आणि या उबाठामध्ये हा फार मोठा फरक झाला आहे.
पुढे ते म्हणाले, जावेद अख्तर यांनी दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना हिंदू संस्कृतीतील सहिष्णुतेचे कौतुक केले. यावर नितेश राणे प्रतिक्रिया देताना म्हणाले, जावेद अख्तरांच्या वक्तव्याचं मी स्वागत करतो. आपला धर्म हा फार विशाल आहे हे आम्ही पहिल्यापासून बोलतोय. जावेद अख्तरांसकट मी सर्वांना सांगतो की मुळात आपण सगळेजण हिंदूच होतो. म्हणून जावेद अख्तरजींना जर हिंदू धर्म स्वीकारुन घरवापसी करायची असेल, जावेदचं 'जितेंद्र' करायचं असेल, तर आम्ही मनापासून त्यांचं स्वागत करतो, असं नितेश राणे म्हणाले.
संजय राऊत हा नेमका कोणाचा पोपट?
संजय राऊत नेहमी एकच टेपरेकॉर्डर लावतो. त्याच्यानुसार हे सरकार फेब्रुवारीमध्ये पडलं पाहिजे होतं, मार्चमध्ये पडलं पाहिजे होतं, उद्धव ठाकरे २५ वर्षे मुख्यमंत्री राहिजे पाहिजे होते. पण त्याची आतापर्यंत कोणतीही भविष्यवाणी खरी ठरलेली नाही. तो असा पोपट आहे की जो योग्य कार्ड कधीच काढत नाही. म्हणून याला कोणीही भाव देणं बंद केलं आहे. संजय राऊत हा नेमका कोणाचा पोपट आहे हे त्याने आधी ठरवावं. सिल्व्हर ओकचा, की दहा जनपथचा की त्याच्या मातोश्रीचा पोपट आहे? हा असा पोपट आहे की ज्याला माहितच नाही की त्याचा मालक कोण आहे किंवा त्याला कोण दाणे घालतं.
संजय राऊतला त्याच्या घरचेही किंमत देत नाहीत
देवेंद्र फडणवीस हे केवळ राज्याचे नेते राहिलेले नाहीत तर ते देशपातळीचे स्टार प्रचारक म्हणून मध्यप्रदेश, राजस्थान आणि बाकी सर्व राज्यांमध्ये फिरत आहेत. तुझ्या उबाठा नावाच्या बचतगटासारखं नुसतं भांडुप किंवा कलानगरपर्यंतचा विषय नाही. आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. कोणाची किती किंमत आहे हे बघायला तू तुझं पोलीस संरक्षण थोडं जरी बाजूला काढलंस तर तुझ्या घरचे लोकही तुला किती किंमत देतात हे तुला कळेल, असं नितेश राणे म्हणाले.
उद्धव ठाकरेला कडक शिक्षा व्हायला हवी
उबाठाची जी काही नेतेमंडळी आहेत ते स्वतःला न्यायालयापेक्षाही मोठे समजायला लागले आहेत. आदरणीय चीफ जस्टिस साहेबांचा अपमान करणं, त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणं या सगळ्या बाबतीत उद्धव ठाकरेला कडक शिक्षा व्हायला हवी. लोकशाहीप्रधान असलेल्या आपल्या भारतात कोणीही न्यायाधीशांवर अशा प्रकारची अभद्र टीका करु नये, असं नितेश राणे म्हणाले.
जरांगे पाटलांनी तब्येतीची काळजी घ्यावी
मनोज जरांगे रोज सकाळी उठून जे माध्यमांशी संवाद साधतात ते त्यांनी पत्रकारांशी थोडं कमी बोललं पाहिजे आणि तब्येतीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी सरकारला जो काही वेळ दिला आहे त्या वेळेत आमचं सरकार गतीने काम करत आहे. काही कर्मचारी तर घरी न जाता नोंदणी शोधण्यासाठी आपापल्या कार्यालयात काम करत आहेत. त्यामुळे जरांगे पाटलांनी तब्येतीची काळजी घ्यावी आणि सरकारला दिलेल्या मुदतीत निकाल देण्याची संधी द्यावी.