वेगवान मेट्रो, पण मोबाईल बंद! अ‍ॅक्वा लाईनवर प्रवाशांचा संताप

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करणारी अ‍ॅक्वा लाईन मेट्रो (मेट्रो-३) सध्या प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचं चित्र आहे. जेव्हीएलआर ते कफ परेड हा दीर्घ प्रवास काही मिनिटांत शक्य झाला असला, तरी वरळी ते कुलाबा या भूमिगत टप्प्यात मोबाईल नेटवर्क खंडित होत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.


प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, आरे जेव्हीएलआर ते सुरुवातीच्या काही स्थानकांपर्यंत मोबाईल नेटवर्क, इंटरनेट आणि कॉल सेवा सुरळीत सुरू असते. मात्र वरळी स्थानकानंतर सिग्नल गायब होतात. सुमारे ३० ते ४० मिनिटे प्रवासी ‘नॉट रिचेबल’ राहतात. या काळात ना कॉल लागत आहेत, ना इंटरनेट सेवा कार्यरत आहे.

या समस्येचा सर्वाधिक फटका कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी आणि कॉलेजला जाणाऱ्या तरुणांना बसत आहे. प्रवासादरम्यान महत्त्वाचे कॉल, ऑनलाईन कामकाज, पेमेंट्स किंवा आपत्कालीन संपर्क पूर्णपणे ठप्प होत असल्याने अनेक प्रवाशांनी या मेट्रो प्रवासावर नाराजी व्यक्त केली आहे.

प्रवाश्यांच्या तक्रारींबाबत मेट्रो प्रशासनाने स्पष्टीकरण दिलं आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅक्वा लाईनचा मोठा भाग भूमिगत असल्याने मोबाईल नेटवर्कसाठी आवश्यक असलेल्या टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चरचं काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. सर्व मोबाईल सेवा प्रदात्या कंपन्यांशी समन्वय साधून नेटवर्क मजबूत करण्याचं काम सुरू असून, लवकरच ही अडचण दूर केली जाईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

नेटवर्क समस्या कायमस्वरूपी नाही नव्या नेटवर्क सुविधा सुरु होईपर्यंत प्रवाश्यांना हा हा त्रास सहन करावा लागणार आहे; असेही मेट्रो प्रशासनाने सांगितल.
Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)