'Wife Swapping' पार्टीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!

विदेशातलं फॅड भारतात दिल्ली, मुंबई, चेन्नईसह अनेक शहरांमध्ये फोफावतेय


चेन्नई : विदेशातलं 'Wife Swapping'चं फॅड भारतात दिल्ली, मुंबई, चेन्नई सारख्या अनेक शहरांमध्ये फोफावत असून यात सिंगल पुरूषांना लक्ष्य करून आरोपी काही स्त्रियांना त्यांची पत्नी म्हणून समोर आणत होते. नंतर त्यांना प्रोत्साहन देत पार्टनरची अदलाबदल करण्याचे एक सेक्स रॅकेट (Sex Racket) चेन्नई पोलिसांनी उघडकीस आणले आहे. यामध्ये “wife swapping” चा प्रकार केला जात होता. दरम्यान कारवाई मध्ये पोलिसांनी ८ जणांना अटक केली आहे. हे रॅकेट मागील ८ वर्षांपासून सुरू होते.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर या पार्ट्यांचे प्रमोशन देखील केले जात होते. अटक केलेल्यांची नावे सेंथिल कुमार, कुमार, चंद्रमोहन, शंकर, वेलराज, पेरारासन, सेल्वन आणि व्यंकटेश कुमार अशी आहेत. त्यांच्यावर “wife-swapping” पार्टी आयोजित केल्याचे आरोप आहेत.


पोलिसांच्या माहितीनुसार, धाड टाकण्याची कारवाई ही शहर पोलिसांकडून चेन्नई मधील ईस्ट कोस्ट रोडवरील पणयूर (ECR) येथे करण्यात आली. शेजार्‍यांच्या तक्रारीनुसार, त्यांना मोठ्या संख्येमध्ये एका घरात अनेक पुरूष आणि महिला जाताना दिसले. असे प्रकार अधूनमधून रोज व्हायला लागल्याने त्यांना संशय आला म्हणून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कारवाई करण्यात आली. या धाडीत पोलिसांना अनेक उच्चभ्रू आणि सुशिक्षित जोडपे सुद्धा आढळून आले.


त्याचबरोबर “wife swapping” च्या नावाखाली सिंगल पुरूषांना लक्ष्य करून वरील ८ आरोपी हे काही स्त्रियांना त्यांच्या पत्नी म्हणून समोर आणत होते. नंतर त्यांना पार्टनरची अदलाबदल करण्यासाठी प्रोत्साहन देत होते. पुरुषांकडून १५ ते २५ हजार रुपयांची मागणी केली जात असे. त्यानंतर पुरुषांना महिलांची ओळख करुन दिली जात होती. एका महिलेच्या जाळ्यात तो पुरुष अडकला की त्याला इतर महिलांचे देखील आमिषही दाखवले जात असे. या धाडीत चेन्नई पोलिसांनी घटनास्थळावरुन आठ जणांना अटक केली आहे. यामध्ये ३० ते ४० वयोगटातील महिलांची सुटका करण्यात आली असून या महिला विवाहित आहेत. त्यांना पैशांचे आमिष दाखवले गेले होते. मौजमजेसाठी पैसे मिळवण्यासाठी काही विवाहित महिला या नराधमांच्या जाळ्यात सापडल्याचीही धक्कादायक बाब यावेळी उघडकीस आली.

Comments
Add Comment

ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्ट ४ नोव्हेंबरला होणार लाँच

मुंबई : ह्युंदाई मोटर इंडिया आपल्या लोकप्रिय एसयूव्ही व्हेन्यूचे दुसऱ्या पिढीचे मॉडेल ४ नोव्हेंबर रोजी भारतीय

घरूनच भरता येणार शाळेची फी ! केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून नवीन घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्यांना पारदर्शकता सुधारण्यासाठी आणि पालकांसाठी सोयी

यंदाच्या दिवाळीत स्वदेशी वस्तूंची मागणी वाढली

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे केलेले आवाहन प्रभावी ठरत आहे. करवा चौथ, दिवाळी

करूर चेंगराचेंगरी प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाचा १३ ऑक्टोबरला निर्णय

चेन्नई : करूर येथील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर १३ ऑक्टोबर रोजी

सर्वसामान्यांसाठी नवा परवडणारा 5G स्मार्टफोन, सॅमसंग गॅलेक्सी M17 5G

सॅमसंग गॅलेक्सी M17 5G फक्त ₹12,499 पासून, दमदार फीचर्स आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स  मुंबई : सॅमसंगने भारतात आपला

अतिरेक्यांना पकडण्याची ती पद्धत चुकली, चिदंबरम यांचे धक्कादायक वक्तव्य

नवी दिल्ली : अतिरेकी भिंद्रनवाला आणि समर्थक शस्त्रसाठा घेऊन शिखांच्या पवित्र सुवर्ण मंदिरात लपले होते. या