नोएडा : बिग बॉस (Bigg Boss) विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) सापांची तस्करी करण्याच्या प्रकरणात चांगलाच अडचणीत सापडला आहे. पण याशिवाय आता आणखी एक आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. तो रेव्ह पार्टी करत असल्याच्या आरोपाखाली उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एल्विशने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
एल्विशवर आरोप दाखल झाल्यानंतर या प्रकरणाशी त्याचा काहीही संबंध नसल्याचे सांगणारा त्याचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी त्याची तीन तास चौकशी केली होती. त्या दरम्यान अनेक गोष्टी समोर आल्या. या चौकशीत आपण नव्हे तर हरियाणवी गायक फाजिलपुरियाने (Fazilpuria) सापांची तस्करी केल्याचा आरोप त्याने केला.
एल्विशच्या एका व्हायरल व्हिडीओमध्ये एल्विशच्या हातात एक नव्हे तर दोन साप आणि एक हरियाणवी गायक दिसला होता. यावरुन पोलिसांनी एल्विशला तुझ्याकडे हे साप कुठून आले असा प्रश्न विचारला होता. तेव्हा त्याने हरियाणाच्या त्या गायकाचेच नाव घेतले. हे साप हरियाणवी गायक फाजिलपुरियाचे असल्याचे तो म्हणाला. फाजिलपुरिया या सापांचं नियोजन पाहत होता. त्याला किती सापांची गरज आहे हे सांगितलं तर तो उपलब्ध करुन द्यायचा, असंही एल्विशनं सांगितलं.
एल्विशनं ज्याचं नाव घेतलं तो फाजिलपुरिया हा एक हरियाणवी गायक आहे. तो सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. त्याच्या गाण्यांना मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचं दिसून आलं आहे. फाजिलपुरियाचं खरं नाव राहुल यादव असं आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…