Urfi Javed : पोलिसांनी जिरवली, उर्फी सुधरली! पूर्ण पोशाखात मंदिरात दिसली!

पोलिसांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी उर्फीचे वाहे गुरूंना साकडे...


अमृतसर : उर्फी जावेद (Urfi Javed) कधी काय कपडे घालेल हे सांगणे फार कठीण आहे. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सतत बघायला मिळतंय. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. उर्फी जावेद हिने शेअर केलेले फोटो तूफान व्हायरल होतात.


उर्फी जावेद (Urfi Javed) हिने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला. उर्फी जावेद हिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बॉस (Bigg Boss) ओटीटीमधून मिळाली. उर्फी जावेद हिच्यावर तिच्या तोकड्या कपड्यांमुळे जोरदार टीका होते. मात्र, या होणाऱ्या टिकेचा काहीच परिणाम हा उर्फी जावेद हिच्यावर अजिबातच होत नाही. परंतु पोलिसांची खिल्ली उडवणे उर्फीला चांगलेच महागात पडले आहे. आता मुंबई पोलिसांच्या कारवाईतून वाचण्यासाठी उर्फीने चक्क वाहे गुरूंना साकडे घातल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.





ग्लॅमरस अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या अनोख्या फॅशनसाठी ओळखली जाते. मात्र काही दिवसांपुर्वी एका बनावट व्हिडिओमुळे उर्फी गोत्यात आली आहे. छोटे कपडे घातल्यामुळे पोलीस तिला अटक करतात असा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी बनावट व्हिडिओ केल्याप्रकरणी तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर उर्फी फरार झाल्याचे सांगण्यात आले. उर्फीने ती दुबईत असल्याचे सांगितले. मात्र आता बनावट व्हिडिओच्या वादानंतर उर्फीने अमृतसरच्या प्रसिद्ध सुवर्ण मंदिराला भेट दिली आहे. सध्या उर्फीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


उर्फी जावेद (Urfi Javed) बुधवारी सुवर्ण मंदिरात पोहोचली. उर्फीची बहीणही यावेळी तिच्यासोबत होती. हे फोटो शेयर करताना उर्फीने लिहिले- वाहेगुरु. यावेळी उर्फीने पिंक कलरचा सूट घातलेला दिसत आहे. उर्फीचा हा संस्कारी लूक सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.


उर्फी जावेदचा (Urfi Javed) हा लेटेस्ट लूक पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे. तिच्या फोटोंवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एकानं लिहिलं की, "अरे भावा, मी हे काय पाहिलं?" तर दुसऱ्याने लिहिलं, "तू असे कपडे घालते." तर एकानं लिहिलयं, "ही उर्फी जावेदच आहे, नाही का?"


सध्या हे फोटो व्हायरल होत आहेत. नेटकरी यावर कमेंट करत आहेत. तर दुसरीकडे आता बनावट व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर खुद्द मुंबई पोलिसांनी त्यांच्या X वर पोस्ट शेअर करत पोस्टमध्ये लिहिले होते की, 'पोलिसांसोबत हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.


मुंबई पोलिसांचा गणवेश वापरून असे व्हिडिओ बनवल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांनी उर्फी जावेदविरोधात एफआयआर नोंदवला आहे.' आता मुंबई पोलीस उर्फीला चौकशीसाठी बोलावतील अशी चर्चा आहे.




Comments
Add Comment

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

सणाचा खरा आनंद लुटत जॅकलिनने साजरा केला ख्रिसमस!

मुंबई: देशभरात सर्वत्र ख्रिसमसची तयारी सुरू असून बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने सणाचा खरा उत्साह आणि

अल्लू अर्जुन–त्रिविक्रम यांची ग्रँड कमबॅक, मायथॉलॉजिकल एपिकमध्ये हिट जोडी पुन्हा एकत्र

१000 कोटींच्या महाप्रकल्पात अल्लू अर्जुन आणि त्रिविक्रम यांच्या रीयुनियनची तयारी आपण अशा एका मोठ्या बातमीबद्दल

दीपिकाच्या आठ तास कामाच्या अटीवर कियाराची प्रतिक्रिया, मातृत्वाबद्दल काय सांगतेय अभिनेत्री?

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने आई झाल्यावर सिनेसृष्टीत आठ तासांच्या कामाची मागणी केल्यामुळे बऱ्याच

आयुष आणि अनुष्काची ‘जब्राट’ जोडी पडद्यावर

छोट्या पडद्यावरील मालिकेमधून घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे ही

धुरंधर स्टार रणवीर सिंगचे दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने यांनी भरभरून कौतुक केले, जाणून घ्या त्यांना “ज्वालामुखी” का म्हटले

धुरंधर बॉक्स ऑफिसवर सातत्याने शानदार कामगिरी करत आहे आणि आता एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे की रणवीर सिंगबाबत