Sada Sarvankar : सिद्धिविनायक मंदिर न्यास हे कोणत्याही गटाकडे नव्हतं, ही जबाबदारी...

सिद्धीविनायकाच्या अध्यक्षपदी निवड झालेले सदा सरवणकर काय म्हणाले?


मुंबई : सिद्धिविनायक मंदिर न्यास (Siddhivinayak Temple Trust) अध्यक्षपदी शिवसेना (Shivsena) माहिम दादर विधानसभेचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांची आज नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) या समितीचे अध्यक्ष होते. मात्र, आज शिवसेनेच्या सदा सरवणकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती केल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. याबाबत सदा सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


“मी स्वतःला भाग्यवान समजतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी माझ्यावर विश्वास टाकून सिद्धिविनायकसारख्या पवित्र संस्थेची जबाबदारी सोपवली. गेली अनेक वर्षे मंदिर परिसरात अनेक गणेश भक्तांच्या अडचणी मी पाहिल्या आहेत. त्यामुळे आता मला गणेश भक्तांसाठी बरंच काम करता येईल” , असं सदा सरवणकर म्हणाले.


“सिद्धिविनायक मंदिर न्यास हे कोणत्याही गटाकडे नव्हतं. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी आणि गेल्या अनेक वर्षे काम करणाऱ्या शिवसेनेकडे होतं. त्याच विचाराने पूर्वी असलेल्या शिवसेनेकडे ही जबाबदारी आली आहे. ही मोठी जबाबदारी आहे. शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्त्वाचे विचार, गणेशभक्तांच्या भावना पूर्ण करण्याची संधी आणि गटातटाचा विचार न करता भाविकांना जास्तीत जास्त कशा सुविधा उपलब्ध करून देता येतील याचा प्रयत्न केला जाईल”, असंही ते म्हणाले.

Comments
Add Comment

नीट-जेईईत फसवणुकीला आळा बसणार

२०२६ पासून ‘चेहरेपट्टीची ओळख’ बंधनकारक नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश

मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यात त्रुटी आढळल्यास सहाय्यक आयुक्तांवर कारवाई

उच्च न्यायालयाचा इशारा मुंबई : मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील वायू प्रदूषण रोखण्यातील कारवाईमध्ये त्रुटी

आमदार झालेल्या मुंबईतील माजी नगरसेवकांचे उत्तराधिकारी कोण?

बाळा नर यांच्या प्रभाग ७७मध्ये सर्वाधिक स्पर्धा मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक ही महायुतीसाठी प्रतिष्ठेची,

भावी नगरसेवकांचे शहरासह प्रभागाच्या विकासाचे व्हिजन काय?

निवडणूक आयोग अर्जाद्वारे घेणार लिहून सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आता

नववर्षात १६५ अतिरिक्त उपनगरीय लोकल सुरू होणार

नव्या प्रकल्पांमुळे लोकल सेवांना वेग; प्रवाशांना दिलासा मुंबई : पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांसाठी येत्या काळात

सेव्हन हिल्स हॉस्पिटलसाठी रिलायन्सने लावली ४५० कोटी रुपयांची बोली

मुंबई : सेव्हन हिल्स हेल्थकेअरच्या मुंबईतील प्रसिद्ध हॉस्पिटल खरेदीसाठी रिलायन्स समूहाशी संबंधित एनके