Chinmay Mandlekar : रंगभूमी दिनानिमित्त चिन्मय मांडलेकरने नाट्यरसिकांना दिली 'ही' खास भेट

गेल्या अनेक दिवसांपासून होती उत्सुकता...


मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा आणि अष्टपैलू अभिनेता अशी चिन्मय मांडलेकरची (Chinmay Mandlekar) ओळख आहे. आजवर त्याने अनेक मालिका व सिनेमांमधून आपल्या उत्तम अभिनयाने स्वतःचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. मात्र, चिन्मय आणि रंगभूमीचं विशेष नातं आहे. नाटकांतूनच घडलेला चिन्मय आजही रंगभूमीवर अनेक नवनवीन प्रयोग करण्यात सक्रिय असतो. आजच्या मराठी रंगभूमी दिनानिमित्त (Marathi Rangbhumi Din) देखील त्याने नाट्यरसिकांसाठी एक खास भेट आणली आहे.


चिन्मय मांडलेकर लिखित दिग्दर्शित 'गालिब' (Galib) हे नवंकोरं नाटक आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आहे. आज शुभारंभाचा प्रयोग गडकरी रंगायतन (Gadkari Rangaytan), ठाणे येथे पार पडणार आहे. 'माझा होशील ना?' या मालिकेतून घराघरात पोहोचलेले गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) आणि विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) या नाटकामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच अश्विनी जोशी आणि गुरुराज अवधानी हे कलाकार देखील गालिब नाटकात दिसणार आहेत.





चिन्मयने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन गालिब या नाटकाच्या प्रयोगाची माहिती दिली होती. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं होतं की, 'तुझ्या डोळ्यात मांजराची धिटाई आणि हरणाचं बावरलेपण दोन्ही आहे, मराठी रंगभूमी दिनी , अर्थात ५ नोव्हेंबरला येत आहे नवीन नाटक-गालिब'. तेव्हापासूनच नाट्यरसिकांना या नाटकाबद्दल उत्सुकता लागून राहिली होती.





गालिब या नाटकाचे पुढील पाच प्रयोगदेखील जाहीर झाले आहेत. या नाटकाचा दुसरा व तिसरा प्रयोग पुण्यात रंगणार आहे. तर पुढील तीन प्रयोग मुंबईत होणार आहेत.



पुण्यातील प्रयोग -


शनिवार ११ नोव्हेंबर दु. १२:३० वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड
शनिवार ११ नोव्हेंबर सायं. ५:३० वा. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे



मुंबईतील प्रयोग -


सोमवार १३ नोव्हेंबर दु. ४ वा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले
शनिवार १८ नोव्हेंबर दु. ४ वा. यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा
रविवार १९ नोव्हेंबर दु. ४ वा. प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली


Comments
Add Comment

'दशावतार' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाले राज ठाकरे? पाहा Video

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या सिनेमाघरांमध्ये दशावतार या सिनेमाची चर्चा सुरू आहे. दशावतार सिनेमा

दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं