Ekda Yeun tar Bagha : हास्यरथी महारथींच्या अभिनयाने सजलेला 'एकदा येऊन तर बघा'!

  594

लेखक, दिग्दर्शक म्हणून प्रसाद खांडेकरचा पहिलाच सिनेमा


मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Cine Industry) अनेक नवनवे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यातच मराठी टेलिव्हिजन विश्वात आघाडीच्या असलेल्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra), 'फू बाई फू' (Fu Bai Fu), 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa yeu dya) या कॉमेडी शोजमधून (Comedy show) आपल्या विनोदी अभिनयाने महाराष्ट्राला खळखळून हसवणारे कलाकार एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यानिमित्ताने सगळ्यांचा लाडका विनोदी अभिनेता प्रसाद खांडेकरने (Prasad Khandekar) पहिल्यांदाच एका चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तसेच या चित्रपटाचे लेखनही प्रसादनेच केले आहे.


विनोदाचा तडका असलेल्या या चित्रपटाचे नावही तितकेच धमाकेदार आहे. 'एकदा येऊन तर बघा' नावाचा हा सिनेमा २४ नोव्हेंबर २०२३ला प्रदर्शित होणार आहे. गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार भोजने अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात पाहायला मिळेल. या पाच जणांसोबत सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे, राजेंद्र शिसातकर, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार आदि कलाकारांची भली मोठी फौज सिनेमात आहे.





फुलंब्रीकर नावाच्या भन्नाट कुटुंबाची आणि त्यांच्या नात्यातील गंमत सांगणारी श्रावण, फाल्गुन आणि कार्तिक या तीन भावांची गोष्ट म्हणजे 'एकदा येऊन तर बघा' हा सिनेमा. फुलंब्रीकर कुटुंब हॉटेल व्यवसाय सुरू तर करतात पण ग्राहक यावेत यासाठी त्यांना काय आणि किती प्रयत्न करावे लागतात? ज्या गिऱ्हाईकांची वाट बघत आहेत ते गिऱ्हाईक हॉटेल मध्ये आल्यावर हे कसे एका प्रॉब्लेम मध्ये अडकत जातात आणि मग पुढे काय होतं ? त्यातून त्यांच्यावर कोणकोणते प्रसंग ओढवतात आणि त्याला ही मंडळी कशी सामोरी जातात? याची गंमतीशीर गोष्ट या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. हे कुटुंब प्रेक्षकांना निखळ हास्याची मेजवानी देईल, असा विश्वास दिग्दर्शक प्रसाद खांडेकरने व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

समुद्र किनाऱ्यांची कचऱ्यातून सुटका

मुसळधार पावसामुळे चौपाट्यांवर पसरलेला कचरा साफ मागील नऊ दिवसांमध्ये ९५० मेट्रीक टन कचऱ्याची लावली

सेंच्युरी मिलची जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा

सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने जागा देणार; गिरणी कामगार संघर्ष समितीच्या मागणीला यश मुंबई : वरळी येथील सेंच्युरी

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबईत सकाळी मुसळधार पाऊस, तासाभरात २० मिमी. पावसाची नोंद

मुंबई : मागच्या आठवड्याच्या सुरुवातीला पावसानं मुंबईला झोडपलं. यानंतर चार दिवस विश्रांती घेऊन पाऊस पुन्हा हजर

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना