Sunday, May 11, 2025

महाराष्ट्रराजकीयमहत्वाची बातमी

Nitesh Rane : बेबी पेंग्विनला लवकरच अटक होणार!

Nitesh Rane : बेबी पेंग्विनला लवकरच अटक होणार!

खाजगी विमानाने गाठलं डेहराडून, हीच का ठाकरेंची मराठा आरक्षणाविषयी काळजी?


आमदार नितेश राणे यांचा हल्लाबोल


मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकारवर निशाणा साधणार्‍या उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी चांगलीच शाळा घेतली आहे. मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) छत्तीसगड दौर्‍यावर गेले, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. या टीकेचा समाचार घेत नितेश राणे यांनी ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या एक्स (X) तसेच फेसबुक (Facebook) अकाऊंटवरुन नितेश राणे यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.


नितेश राणे यांनी लिहिले आहे की, मला मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे कुटुंब काल दुपारी एक वाजता खासगी विमानातून आणि गेट नंबर आठमधून त्यांचे कामगार आणि आचारी सोबत घेऊन डेहराडूनला रवाना झालं. हीच का ठाकरेंची मराठा आरक्षणाविषयी काळजी? मनोज जरांगे यांचं उपोषण संपेपर्यंत देखील त्यांना थांबता नाही आलं का? मग हे लोक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका कशी करु शकतात? ते तर पक्षाच्या कामाकरता गेले होते, यांच्यासारखे पिकनिक करायला नाही, अशी टीका नितेश राणे यांनी केली.


बेबी पेंग्विनला लवकरच अटक होणार!


तीन वर्षांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली होती. त्याच्या काही दिवस आधीच दिशा सालियन हिनेदेखील आत्महत्या केली होती. त्यानंतर नितेश राणे सातत्याने या दोन्ही आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे नाव घेत आहेत. त्यावरही नितेश राणे यांनी या ट्विटमध्ये भाष्य केले आहे. ते म्हणतात, बेबी पेंग्विनला सुशांत सिंह राजपूतबद्दल कोर्टात सुरु होणार्‍या केसमध्ये लवकरच अटक होणार आहे. ही अटक टाळण्यासाठी बेबी पेंग्विन डेहराडूनमधूनच गायब होणार नाही, अशी मी अपेक्षा करतो, असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे.

Comments
Add Comment