
मुंबई: एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी(st bus employee) राज्य सरकारकडून गुडन्यूज समोर आली आहे. राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून त्यांच्या वेतनासाठी ३८७ कोटी रूपयांची मदत केली जाणार आहे. या निर्णयामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी नक्कीच गोड होणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळ आनंदाची होणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे या कर्मचाऱ्यांचा वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे. याआधीही सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाची घोषणा केली होती. तसेच त्यांना १२,५०० रूपये सण अग्रिम म्हणून दिले जातील असे जाहीर केले होते.
कोरोना प्रादुर्भावाचा फटका एसटी महामंडळाला बसला होता. यामुळे एसटीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला होता.