Shahrukh Khan 58th Birthday: बर्थडेच्या आधीच शाहरूखला पाहण्यासाठी चाहत्यांची तोबा गर्दी, पाहा व्हिडिओ

मुंबई: बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेल्या शाहरूख खानच्या(shah rukh khan) चाहत्यांची संख्या जगभरात काही कमी नाहीये. त्याने आपल्या अभिनयाने चाहत्यांचा प्रचंड मोठा वर्ग गोळा केला आहे. त्याची एक झलक मिळवण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. २ नोव्हेंबरला किंग खान आपला ५८वा वाढदिवस साजरा करत आहे. किंग खानच्या चाहत्यांसाठी त्याचा वाढदिवस हा एखाद्या सणापेक्षा काही कमी नसतो. यातच किंग खानचा वाढदिवस सुरु होण्याआधीच चाहत्यांनी मन्नतबाहेर गर्दी केली.



शाहरूखला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले चाहते


हजारो चाहते एकद दिवस आधीच त्याच्या घराबाहेर वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी पोहोचले होते. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत किंग खानचे चाहते त्याच्या घराबाहेर दिसत आहेत. या दरम्यान ते जोरजोरात We Love You Shah Rukh आणि हॅपी बर्थडे शाहरूख खान असे म्हणताना दिसत आहेत. चाहत्यांच्या चेहऱ्यावर किंग खानच्या ब्रर्थडेचा आनंद दिसत आहे.


 


शाहरूखच्या बर्थडेला मिळणार खास सरप्राईज


२ नोव्हेंबरला शाहरूख ५८ वर्षांचा होईल. या खास दिवशी किंग खान गिफ्टही देणार आहेे. शाहरूखच्या वाढदिवसी त्याचा बहुप्रतिक्षित सिनेमा डंकीचा टीझर लाँच होणार आहे. यानंतर चाहत्यांचा आनंद गगनात मावणार नाही.



बॉक्स ऑफिसवर शाहरूखच्या सिनेमांची धमाल


कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास शाहरूखने या वर्षी दोन सगळ्यात मोठे ब्लॉकबस्टर सिनेमे पठाण आणि जवान केले. या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला जमवला. आता तो राजकुमार हिरानी यांच्या डंकीमध्ये दिसणार आहे.

Comments
Add Comment

गरोदरपणानंतर रुबिना दिलीकचा आत्मविश्वास डगमगला!

मुंबई: पती-पत्नी और पंगा या शोमध्ये अभिनेत्री रुबिना दिलैक पती अभिनव शुक्ला सोबत मस्ती करताना दिसत आहे. या

डीपफेक व्हिडिओंचा गैरवापर: ऐश्वर्या-अभिषेकची थेट हायकोर्टात धाव, YouTube-Google कडे ४ कोटींची मागणी!

मुंबई: बॉलिवूडचे पॉवर कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी यूट्यूब आणि त्याची मूळ कंपनी गुगल

दशावतार सिनेमाने अवघ्या तीन आठवड्यात केला विक्रम... २१ दिवसात किती कोटी कमावले?

दशावतार हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली छप्प्पर फाड कमाई करत आला आहे. तब्ब्ल तीन आठवडयांनी सुद्धा

महात्मा गांधींच्या पणतीचे ग्लॅमरच्या जगात वेगळे स्थान!

महात्मा गांधी यांचे नाव संपूर्ण जग आदराने आणि श्रद्धेने लक्षात ठेवते. त्यांचे विचार, तत्त्वे आणि सत्य व अहिंसेचा

नांदेडच्या कैलास यांनी केबीसी १७ मध्ये जिंकले ५० लाख रुपये

कौन बनेगा करोडपती’ हा शो छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय शो आहे. आजवर लाखो स्पर्धकांनी या शोमध्ये सहभागी होत

अॅक्शन चित्रपटाद्वारे हॉलिवूड डेब्यू करणार टायगर श्रॉफ

अभिनेता टायगर श्रॉफ लवकरच हॉलिवूड चित्रपटात दिसू शकतो. त्याचा पहिला चित्रपट एक जागतिक अॅक्शन थ्रिलर असेल. या