Hindi movie: स्पृहा जोशी दिसणार हिंदी सिनेमात, शेअर केला व्हिडिओ

मुंबई: मराठीतील आघाडीची अभिनेत्री स्पृहा जोशी लवकरच बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. हिंदी सिनेमात स्पृहा जोशी बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशीसह दिसणार आहे. स्पृहा आणि शर्मन जोशी 'सब मोह माया है' या सिनेमात दिसणार आहे. येत्या १८ नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.


स्पृहाने या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांसाठी शेअर केला आहे. या सिनेमात स्पृहा जोशीने शर्मन जोशीच्या बायकोची भूमिका साकारली आहे. यात शर्मन जोशीला आपल्या वडिलांसारखीच सरकारी आरामाची नोकरी करायची आहे. त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू असतात मात्र त्याला यश मिळत नसते.


 


अशातच वडिलांचा मृत्यू झाला तर त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर नोकरी मिळते. मात्र वडील जिवंत असताना हे करायचे कसे असा प्रश्न शर्मन जोशीला पडतो. ती नोकरी मिळवण्यासाठी तो काय खटपट करतो हे अतिशय रंजक पद्धतीने या सिनेमात दाखवले आहे. शर्मनच्या वडिलांची भूमिका अन्नू कपूर यांनी साकारली आहे.


बाप के बदली नौकरी, नौकरी के बदले बाप', कितना भारी पडेगा ये सौदा फॉर मिश्रा परिवार असं तिने हा ट्रेलर शेअर करत म्हटले आहे.


स्पृहा जोशीने अनेक मराठी मालिका तसेच चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनेक ऐतिहासिक मालिकांमधील तिच्या भूमिकेला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली आहे. इतकंच नव्हे तर स्पृहा उत्तम निवेदक तसेच लेखिका आहे.

Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

या ५ तेलांचा उपयोग ठरेल केसांसाठी वरदान !

केसांची काळजी घेणे हे अनेकांसाठी खूप महत्वाचे असते. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी ट्राय करण्याची इच्छा असते, पण

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र