Mukesh Ambani threat mails : मुकेश अंबानींच्या मागे धमकीसत्र सुरुच; मेल करणारा म्हणतो, आता ४०० कोटी द्या...

गोळ्या घालण्याची दिली धमकी


मुंबई : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. म्हणूनच की काय त्यांना धमकी देणारा पैशांची मागणी दुपटी तिपटीने वाढवतच चालला आहे. चार दिवसांपूर्वी धमकी देणार्‍या व्यक्तीकडूनच मुकेश अंबानींना पुन्हा एकदा धमकीचा ई-मेल (Threat mail) आला आहे. यावेळेस तब्बल ४०० कोटी रुपयांची (400 crores) मागणी करण्यात आली आहे. पैसे दिले नाही तर गोळ्या घालू, असंही या मेलमध्ये म्हटलं आहे.


मुकेश अंबानींना २७ ऑक्टोबरला त्यांच्या ई-मेल अकाऊंटवरुन एका अज्ञात व्यक्तीचा मेल आला होता. या मेलमध्ये त्याने २० कोटी रुपयांची मागणी करत पैसे दिले नाही तर जीवेमारण्याची धमकी दिली होती. शिवाय मारण्यासाठी आमच्याकडे उत्तम नेमबाज आहेत, असंही त्याने म्हटलं होतं. यासंबंधी अंबानींच्या सुरक्षारक्षकांनी पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र, तपास सुरु असताना दुसर्‍याच दिवशी पुन्हा एकदा त्याच व्यक्तीकडून धमकीचा मेल आला, ज्यात २०० कोटींची मागणी केली होती. आधीच्या मेलला उत्तर न दिल्याने हा मेल केला असल्याचे त्याने म्हटले होते.


यानंतर पुन्हा एकदा मुकेश अंबानी यांनी त्याच व्यक्तीचा धमकीचा मेल आला आहे. पुन्हा एकदा रिप्लाय न दिल्याने हा मेल करण्यात आला आहे. ४०० कोटी रुपये द्या नाहीतर गोळ्या घालू, असं त्या व्यक्तीने म्हटलं आहे. 'तुमची सुरक्षा कितीही चांगली असली तरीही आम्ही तुम्हाला मारू शकतो. यावेळी किंमत ४०० कोटी रुपये आहे आणि पोलीस आमचा तपास करुन अटक करू शकत नाहीत', असंही या मेलमध्ये म्हटलं आहे. या धमकीचं गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी कालपासून अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानी (अँटिलियाची) सुरक्षा वाढवली आहे.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य