आमदार अपात्रता याचिकांप्रकरणी ३१ डिसेंबरपर्यंत कारवाई पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे नार्वेकरांना निर्देश

नवी दिल्ली : शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून तसेच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या आमदार अपात्रता याचिकांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज (सोमवारी) एकत्रितपणे सुनावणी घेण्यात आली. यावेळी अपात्रतेच्या याचिका निकाली काढण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून टाळाटाळ होत असल्याचा आक्षेप दोन्ही याचिकांद्वारे सर्वोच्च न्यायालयात घेण्यात आला. यावर आज झालेल्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ३१ डिसेंबरपर्यंत सगळी कारवाई पूर्ण करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.


सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली कागदपत्रे विधानसभा अध्यक्षांसमोर दाखल करावीत आणि दोन दिवसांत अध्यक्षांनी त्या कागदपत्रांचा निवाडा करावा आणि पुढे जावे, अशी सूचनाही सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सादर केलेले नवे वेळापत्रक फेटाळून लावत न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. हिवाळी अधिवेशन असल्याने थोडा वेळ वाढवून द्यावा, अशी विनंती नार्वेकर यांचे वकील करत होते, मात्र सर्वोच्च न्यायालयाने वेळ वाढवून द्यायला नकार दिला.


विधानसभा अध्यक्षांना आम्ही अनेक संधी दिल्या आहेत. आज प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. पुढच्या निवडणुकांपर्यंत आम्ही हा गोंधळ सुरू ठेवू शकत नाही, असेही कोर्टाने यावेळी म्हटले. जर, विधानसभा अध्यक्ष या याचिकांवर सुनावणी करू शकत नसतील तर, न्यायालयावर सुनावणी घेण्याची वेळ आली आहे असे दिसते. ३१ डिसेंबरच्या अगोदर सुनावणी पूर्ण करा, अन्यथा आम्हाला पुढील निर्णय घ्यावा लागेल, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सांगितले.

Comments
Add Comment

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या

India-Finland Bilateral relations : भारत आणि फिनलँडमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे

पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. देशाचे नागरी विमान

Apple Event 2026 : ॲपलचा भारतात महाधमाका! आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली 'MacBook Pro 2026' लाँच; कधी सुरु होणार प्री ऑर्डर ?

मुंबई : टेक विश्वातील दिग्गज कंपनी अ‍ॅपलने (Apple) भारतीय बाजारपेठेत आपले सर्वात शक्तिशाली लॅपटॉप MacBook Pro (2026) अधिकृतपणे

PM Modi : युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची ओमान, कतारच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त लष्करी कारवाई केल्यानंतर पश्चिम आशिया प्रदेशातील परिस्थिती झपाट्याने

Iran Israel War : युद्धाच्या सावटाखालील मराठी नागरिकांसाठी मुख्यमंत्री मदतीला धावले; विशेष व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाइन जारी

परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय दूतावास अलर्ट मोडवर मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर,