Kaali peeli Padmini Taxi : काळ्या-पिवळ्या पद्मिनी टॅक्सीचा प्रवाशांना निरोप; आज मुंबईतील शेवटचा दिवस...

काली पीलीला लागणार कायमचा ब्रेक


मुंबई : मुंबईची (Mumbai) ओळख असणार्‍या अनेक गोष्टी नवनवीन सोयीसुविधांमुळे विरत चालल्या आहेत. काहीच दिवसांपूर्वी मुंबईच्या प्रसिद्ध डबलडेकरने (Double decker) प्रवाशांचा निरोप घेतला. शेवटची डबलडेकर रस्त्यावरुन धावत असताना चालक आणि कंडक्टरसोबत प्रवासीही भावूक झाले होते. मुंबईची आणखी एक ओळख म्हणजे चाळसंस्कृतीदेखील (Chawl) विरण्याच्या मार्गावर आहे. अनेक चाळींची जागा मोठमोठ्या इमारतींनी घेतली आहे. त्यातच आता आणखी एक गोष्ट मुंबईकरांचा निरोप घेणार आहे. ती म्हणजे पन्नास दशकांहून अधिक काळ मुंबईच्या रस्त्यांवरुन फिरणारी काळी पिवळी 'पद्मिनी टॅक्सी' (Kaali peeli Padmini Taxi).


आज शेवटची काली पीली पद्मिनी टॅक्सी मुंबईच्या रस्त्यावरुन धावणार आहे. मात्र, उद्यापासून या टॅक्सीला कायमचा ब्रेक लागेल. नवे मॉडेल्स आणि अॅपमुळे ही काळी-पिवळी टॅक्सी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र नव्या मॉडेलच्या काळ्या पिवळ्या टॅक्सी मुंबईच्या रस्त्यांवरुन धावताना दिसणार आहेत.


पद्मिनी टॅक्सीची सुरूवात १९६४ साली झाली होती. या टॅक्सीचे उत्पादन २००१ साली बंद करण्यात आले. परिवहन विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑक्टोबर २००३ रोजी ताडदेव आरटीओ येथे काळी-पिवळी टॅक्सी म्हणून नोंद झालेली टॅक्सी ही शेवटची 'प्रीमियर पद्मिनी' होती. ही शेवटची टॅक्सी खरेदी करणारे मालक अब्दुल करीब कारसेकर म्हणाले, 'ही टॅक्सी म्हणजे मुंबईची शान आहे'. परंतु या टॅक्सीला आता मुंबईकरांना कायमचा निरोप द्यावा लागणार आहे.

Comments
Add Comment

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Mumbai News : मुंबईतील जुन्या भागांचे रूप पालटणार

म्हाडाचे ९२५ एकरांवर ११ महत्त्वाकांक्षी प्रकल्प, ४ लाख कोटींची होणार गुंतवणूक मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील

Minister Shivendrasinhraje Bhosale : रस्ते सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य; आंबेनळी घाटासह अपघातप्रवण मार्गांवर विशेष उपाययोजना

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची विधानसभेत माहिती मुंबई : राज्यातील नागरिकांना

Uday Samant : सिंधुदुर्गमध्ये 'मालवणी भाषा भवन' उभारणार

मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; पालकमंत्री नितेश राणे यांनी मानले आभार मुंबई : कोकणची समृद्ध संस्कृती

Chandrashekhar Bawankule : राज्यात आणखी ८८ नवी महसूल कार्यालये

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; हरकती-सूचनांसाठी १५ दिवसांची जाहीर सूचना जारी मुंबई : राज्यातील

पोक्रा' योजनेत पोलादपूरचा समावेश आता अशक्य; आमदार प्रवीण दरेकरांच्या प्रश्नावर मंत्री आशिष जयस्वाल यांचं उत्तर

मुंबई : जागतिक बँकेच्या कडक अटी आणि करारातील तांत्रिक बाबींमुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोक्रा