मुंबई: यंदाच्या वर्षी २८ ऑक्टोबरला चंद्रग्रहण(lunar eclipse) आहे. हे वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण आहे असे. कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी हे ग्रहण लागत आहे. खास बाब म्हणजे हे ग्रहण पूर्ण नव्हे तर खंडग्रास चंद्र ग्रहण असणार आहे म्हणजेच अंशत: हे दिसेल. भारतासह अनेक देशांमध्ये हे चंद्र ग्रहण दिसेल. चंद्र ग्रहणाचा सूतक काळ ९ तास आधी सुरू होईल. चंद्र ग्रहण आणि याच्या सूतक काळादरम्यान काही गोष्टींबाबत लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
जाणून घेऊया खंडग्रास म्हणजेच आंशिक रूपातील चंद्र ग्रहणात काय आणि कसे दिसेल. ज्योतिष एक्सपर्टच्या मते भारतात चंद्र ग्रहण खंडग्रास दिसणार आहे. याचा अर्थ चंद्रावरती पृथ्वीची पूर्ण सावली नाही पडणार तर काही भागांतच पडणार आहे. त्यामुळे आंशिक रूपात हे दिसेल.
खरंतर तीन प्रकारचे चंद्र ग्रहण असतात यात पूर्ण चंद्र ग्रहण, आंशिक चंद्र ग्रहण आणि उपच्छाया यांचा समावेश आहे. यावेळेस २८ ऑक्टोबरला शनिवारी लागणारे चंद्र ग्रहण हे आंशिक आहे. या ग्रहणाचे धार्मिक महत्त्वही आहे. यामुळेच या चंद्र ग्रहणाचा सूतक काळ मान्.
काय सावधानता बाळगावी
ज्योतिष तज्ञांच्या मते चंद्र ग्रहणादरम्यान गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. खासकरून गर्भवती महिलांनी सूतका काळात घराच्या बाहेर पडू नये. गर्भवती महिलांशिवाय, अन्य लोकांनाही या सूतक काळात बाहेर जाऊ नये. वैदिक शास्त्रात असे सांगितले आहे की ग्रहणादरम्यान घराच्या बाहेर पडू नये कारण या काळात चंद्राच्या किरणांमुळे वातावरण दूषित होते. तसेच बाहेर पडणाऱ्या व्यक्तीवर याचा नकारात्मक परिणाम होतो.