धुळे : माणसांनी जंगलावर अतिक्रमण केल्याने प्राण्यांचे मानवी वस्तीत येणे ही आता नवी बाब नाही. त्यांचं घर हिरावल्याने आपणच या गोष्टीला जबाबदार आहोत. मात्र, अशाच एक घटनेमुळे धुळ्यातील (Dhule news) मोघण शिरुड गावातील चिमुकल्यांचे नाहक बळी गेले आहेत. या गावात बिबट्याने (Leopard) शिरकाव करुन उच्छाद मांडला आहे. गेल्या पाच दिवसांत तीन जणांचा बळी गेला असून त्यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. शिवाय आणखी एका लहान मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. यामुळे गावात खळबळ उडाली आहे.
शिरुर गावच्या परिसरात बिबट्याने चांगलीच दहशत माजवली आहे. त्यामुळे त्याला जेरबंद करणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्य वन्यजीव संरक्षक महिद गुप्ता यांच्याशी या घटनेसंदर्भात आज चर्चा केली. यावेळी त्यांनी बिबट्याला बेशुद्ध करण्याचा आणि ते शक्य झालं नाही तर ठार मारण्याचे आदेश दिले आहेत.
शिरुर गावात बिबट्याने घातलेल्या धुमाकुळामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. तीन जणांचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जीव गेल्याने नागरिक घाबरुन वावरत आहेत. काल सकाळी एका लहान बालकाचा देखील बिबट्याने चावा घेतला. त्या बालकावर सध्या हिरे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
एकीकडे बिबट्याने उच्छाद मांडलेला असताना दुसरीकडे गावात कापूस वेचणीच्या कामाला वेग आला आहे. हे दिवस कापूस वेचणीचे असल्याने या वेळेतच गावात बिबट्या शिरल्याने ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. शेतकर्यांना शेतात जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे आणि त्या पद्धतीची दवंडी गावात पिटवण्यात आली आहे.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…