India Pakistan Border : पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळवणार... सीमेवर उभारणार शिवरायांचा अश्वारुढ पुतळा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा


मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची वाघनखं (Wagh Nakh) महाराष्ट्रात आणण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) गेले अनेक दिवस प्रयत्न करत आहेत. मात्र, विरोधकांचे या गोष्टीवरुनही राजकारण करणे चालूच आहे. अनेकांनी वाघनखांवर प्रश्नदेखील उपस्थित केले. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वाघनखांबाबत शंका उपस्थित करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठी घोषणा देखील केली.


मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं महाराष्ट्रात, मायदेशी आणली जाणार आहेत, हे देशासाठी अभिमानास्पद असून काहीजण मात्र त्याबाबत शंका उपस्थित करत आहेत. वाघनखांबाबत आक्षेप घेणाऱ्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श सोडून, अफझल खानाचा आदर्श स्विकारलेला दिसतो आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.


पुढे ते म्हणाले, आमचे मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला स्वतः गेले. एक इतिहास असलेली वाघनखं आपल्या देशात, आपल्या राज्यात आणणं हे प्रत्येक देशवासीयासाठी गौरवास्पद, अभिमानास्पद आणि प्रत्येकाला हेवा वाटावा असं आहे. पण दुसरीकडे काही लोक सरकारच्या प्रत्येक कामावर विरोध, द्वेष, मत्सर व्यक्त करतात. परंतु सांस्कृतिक कार्य विभाग आपलं काम करेल, वाघनखं येतील आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या वस्तू आणण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं मुख्यमंत्री म्हणाले.



सीमेवर छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारणार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वारुढ पुतळा आम्ही इथून पाठवला आहे. भारत पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना केली जाणार आहे. पाकिस्तानला देखील छत्रपती शिवरायांच्या तलवारीची भीती वाटेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. याआधीही सीमेवर पुतळा उभारण्यासाठी प्रस्ताव देण्यात आले होते मात्र आता मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यामुळे हा पुतळा लवकरच उभारला जाणार आहे.

Comments
Add Comment

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कारवाईचा बडगा मुंबई : अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना