World cup 2023: आज विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्सचा सामना

Share

दिल्ली: विश्वचषकात आज ऑस्ट्रेलियाचा(australia) सामना नेदरलँडशी(netherlands) रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाने आपल्या मागील सामन्यात पाकिस्तानला हरवले होते. तर नेदरलँडसला गेल्या सामन्यात श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान, नेदरलँड्स संघाने या विश्वचषकात धक्कादायक निकालाची नोंद केली आहे.

नेदरलँड्सच्या संघाने द. आफ्रिकेला हरवले होते आणि श्रीलंकेलाही धक्का दिला असता. अशातच ऑस्ट्रेलिया हा सामना हलक्याने घेणार नाही. ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स यांच्यात आतापर्यंत २ वनडे झाले आहेत. दोनही सामने विश्वचषकात खेळवण्यात आलेत.

२००३ आणि २००७मध्ये झालेल्या विश्वचषकातील सामन्यात ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सवर मोठा विजय मिळवला होता. दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाला विजय मिळवला होता. दोन्ही संघादरम्यान तिरूअनंतपुरम येथे वॉर्म अप सामना खेळवण्यात आला होता. पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्यात मिचेल स्टार्कने हॅटट्रिक घेतली होती.

नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात ट्रेविस हेड खेळू शकतो. हात तुटल्यामुळे तो पहिले ४ सामने खेळू शकला नव्हता. मात्र सोमवारी त्याने टीमच्या नेट सेशनमध्ये सराव केला. अशातच हेड हा सामना खेळू शकतो. नेदरलँडकडे आर्यन दत्त आणि वॅन डर मर्वच्या रूपात दोन स्पिन गोलंदाज आहेत जे पॉवरप्लेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ओपनरची परीक्षा घेऊ शकतात.

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

3 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

3 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

4 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

4 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

4 hours ago