One Nation One Election बाबत झाली बैठक, २०२४च्या निवडणुकीत लागू करणे अशक्य

नवी दिल्ली: देशात वन नेशन वन इलेक्शनबाबत बुधवारी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीची दुसरी बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे, जम्मू-काश्मीरचे माजी सीएम गुलाम नबी आझाद यांच्याशिवाय विधी आयोगाचे चेअरमन ऋतु राज अवस्थी उपस्थित होते. या दरम्यान, लॉ कमिशनकडून संपूर्ण रोडमॅप सादर केला.


सूत्रांच्या माहितीनुसरा, बैठकीत लॉ कमिशनने माहिती दिली की वन नेशन, वन इलेक्शन जर देशात लागू करायचे असेल तर त्यासाठी कायदा आणि संविधानात काय बदल करावे लागतील.



२०२४च्या निवडणुकीत शक्य नाही


सूत्रांच्या माहितीनुसार, कमिशनने समितीला सांगितले की सध्या २०२४च्या निवडणुकीत वन नेशन, वन इलेक्शन कायदा लागू करणे शक्य नाही. मात्र २०२९मध्ये हा कायदा लागू केला जाऊ शकतो. समितीने आपल्या दुसऱ्या बैठकीत यावेळेस लॉ कमिशनचच्या चेअरमननाही आमंत्रित केले होते. देशात एकत्र निवडणुका कशा पद्धतीने घेतल्या जाऊ शकतात हे समितीला जाणून घ्यायचे होते. यासाठी विधी आयोगाचे सल्ले आणि विचार जाणून घेण्यासाठी बोलावले होते.



माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखालील गठित समिती


केंद्र सरकारकडून शनिवारी २ सप्टेंबरला वन नेशन वन इलेक्शनवर कशा पद्धतीने काम केले जाईल याबाबत ८ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होत. समितीच्या अध्यक्षपदी रामनाथ कोविंद यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांना विशेष आमंत्रित सदस्य म्हणून सामील करण्यात आले होते.


याशिवाय समितीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी, राज्यसेभेचे माजी नेते गुलाम नबी आझाद, वित्त कमिशनचे माजी चेअरमन एनके सिंह, लोकसभेचे माजी महासचिव सुभाष सी कश्यप, माजी सॉलिसिटर जनरल हरिश साळवे आणि माजी सीव्हीसी संजय कोठारी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

जैसलमेरमध्ये भीषण अपघात, बसला आग लागल्याने २० जणांचा मृत्यू

मुंबई : जैसलमेरहून जोधपूरकडे निघालेल्या एका खासगी बसला जैसलमेर-जोधपूर महामार्गावर थईयात

योगी सरकारची उत्तर प्रदेशातील १.८६ कोटी महिलांना 'ही' दिवाळी भेट!

लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील १.८६ कोटी माता-भगिनींना

गुगलची भारतात $१५ अब्ज गुंतवणूक; विशाखापट्टणममध्ये देशातील पहिले गिगावॅट-स्केल एआय हब उभारणार

नवी दिल्ली : भारताच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा गाठत, गुगलने भारतात आपल्या

डॉक्टरांनी लाच घेऊन मुलांच्या जीवाशी खेळ केला, पोलिसांचा कोल्ड्रिफ प्रकरणात गंभीर आरोप

छिंदवाडा : खोकल्यावरचे औषध म्हणून कोल्ड्रिफ कफ सिरप प्यायलेल्या मध्य प्रदेशमधील अनेक लहान मुलांचा मृत्यू झाला.

IND vs WI : वेस्ट इंडिजचा सुपडा साफ! टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ७ विकेट्सने दणदणीत विजय, सलग १०वी कसोटी मालिका खिशात!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या (India vs West Indies) दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवून

ला निनामुळे नोव्हेंबरपासून तीव्र थंडीचा अंदाज

राज्यातून मान्सून माघारी परतलाय, पण ऑक्टोबर हीटमुळे सध्या अंगातून घामाच्या धारा निघत आहे. पहाटे हवेत प्रचंड