ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा ड्रायव्हर सचिन वाघला घेऊन मुंबई पोलिसांची देवळा तालुक्यातील लोहनेर ठेगोडे येथील गिरणा नदीमध्ये मध्यरात्री शोध मोहीम
नदीत ड्रग्जच्या २ गोण्या सापडल्या, एका गोणीत साधारणतः ४० ते ५० किलो ड्रग्स असल्याचा पोलिसांचा अंदाज
नाशिक : ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा ड्रायव्हर सचिन वाघला घेऊन मुंबई पोलिसांचे पथक मध्यरात्री नाशिकमध्ये दाखल झाले होते. या पथकाने मध्यरात्री नाशिकच्या अनेक भागात शोध मोहीम राबवली. तसेच नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहनेर ठेगोडे येथील गिरणा नदीपात्रात सचिन वाघने ड्रग्ज फेकले होते ते सर्व जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मध्यरात्री मुंबई पोलिसांनी गिरणा नदी पात्रात ड्रग्सची शोध मोहीम सुरु केली होती. त्यानंतर नदीपात्रातून दोन बॅग ड्रग्स हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. हे सुमारे शंभर कोटी रुपयांचे २ गोणी ड्रग्ज मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यासाठी प्रशिक्षित स्कुबा डायव्हिंग करणाऱ्यांच्या मदतीने नदीपात्रात ड्रग्ज साठ्याचा शोध घेण्यात आला. सचिन वाघ यानेच हे ड्रग्ज नदीपात्रात फेकले होते.
दरम्यान, नाशिकमधून हा साठा शोधण्यासाठी मुंबई पोलिसांच्या टीमने सोमवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत तब्बल ४ तास अंडर वॉटर सर्च ऑपरेशन केले. रायगडमधील प्रशिक्षित स्कुबा डायव्हरच्या मदतीने १५ फूट खोल नदीपात्रात रात्रीच्या अंधारात सर्च ऑपरेशन राबवण्यात आले.