World cup 2023: अफगाणिस्तानचा पाकिस्तानला 'दे धक्का', मिळवला ८ विकेट राखून विजय

चेन्नई: चेन्नईच्या मैदानावर आज विश्वचषक २०२३मधील(world cup 2023) आणखी एक धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. याआधीच इंग्लंडला जोरदार धक्का देणाऱ्या अफगाणिस्तानने पाकिस्तानलाही जबरदस्त धक्का देत विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने ५० षटकांत ७ बाद २८२ हा तगडा स्कोर उभा केला होता.


हा स्कोर पाहता अफगाणिस्तान आव्हान पेलेल का यात थोडी शंका व्यक्त केली जात होती. मात्र चेन्नईच्या मैदानावर चमत्कारच घडला. एखादा दिग्गज संघ ज्याप्रमाणे खेळतो त्याचप्रमाणे अफगाणिस्तानचा संघ खेळला. आणि फक्त खेळलाच नाही तर पाकिस्तानविरुद्ध जिंकलाही.


शेवटच्या काही षटकांमध्ये अफगाणिस्तानआणि पाकिस्तान यांच्यात चुरस पाहायला मिळाली. मात्र बॉलचा फरक वाढल्याने अफगाणिस्तानचा विजय सोपा झाला. पहिल्यांदा फलंदाजी कऱणाऱ्या पाकिस्तानी संघात अब्दुल्लाह शफीकने ५८ धावा केल्या. तर बाबर आझमने ७४ धावांची खेळी केली. त्यानंतर शादाब खानने ४० धावा तर इफ्तिखार अहमदने ४० धावा केल्या. याच्या जोरावर पाकिस्तानच्या संघाला ७ बाद २८२ धावा करता आल्या.


दुसरीकडे पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानने दमदार सुरूवात केली. अफगाणिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांनी शानदार अर्धशतके ठोकताना भक्कम पाया रचला. रहमनुल्लाह गुरबाजने ६५ धावा केल्या तर इब्राहिम झारदानने ८७ धावांची खेळी केली. रहमत शाह ७७ धावांवर नाबाद राहिला तर हश्मतुल्लाह शाहिदी ४८ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानच्या गोलंदाजांना अफगाणिस्तानचे केवळ २ गडी बाद करण्यात यश मिळाले.

Comments
Add Comment

श्रेयस अय्यरला सिडनीतील हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; फिट झाल्यानंतर भारतात परतणार

सिडनी : भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर गेल्या काही दिवसांपासून सिडनीमधील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट

टेनिसपटू रोहन बोपण्णाची टेनिसमधून निवृत्ती

मुंबई : भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णा याने निवृत्तीची घोषणा केली आहे. वयाच्या ४३ व्या वर्षी तो पहिल्यांदाच

ICC Women's World Cup 2025 : महिला वर्ल्ड कप २०२५ च्या विजेत्या-उपविजेत्या संघाला किती रक्कम मिळणार? पराभूत संघावरही होणार 'कोट्यवधींचा वर्षाव'! आकडेवारी पहाच...

नवी मुंबई : महिला विश्वचषक २०२५ (ICC Women's World Cup 2025) चा अंतिम सामना रविवार, २ नोव्हेंबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन

क्रिकेटमध्ये पुरुष आणि महिलांसाठी सात वेगवेगळे नियम

मुंबई : भारतीय पुरुष क्रिकेट संघ (Indian cricket team) सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत व्यस्त आहे. तर

ICC Womens World Cup Final : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तुफान झुंज; फायनल कधी, कुठे, किती वाजता? 'या' ॲपवर मोफत पाहा!

नवी मुंबई : हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये ऐतिहासिक

जोश हेझलवूडची एमसीजीवर 'ड्रीम स्पेल'!

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मेलबर्न क्रिकेट