धरमशाला: एकदिवसीय विश्वचषक २०२३मध्ये भारतीय संघ आपला पाचवा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळत आहे. हा सामना धरमशालामध्ये खेळवला जात आहे. दुपारी दोन वाजता हा सामना सुरू होईल. या विश्वचषकात आतापर्यंत भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी एकही सामना गमावलेला नाही. दोन्ही संघ विजयीपथावर आहेत. त्यामुळे आता हे पाहावे लागेल की कोणत्या संघाचा आज विजयरथ रोखला जाणार. जो संघ हा सामना जिंकणार तो संघ पॉईट्सटेबलमध्ये १० पॉईंट्ससह टॉपवर पोहोचेल आणि सेमीफायनलच्या जवळ पोहोचणार.
मात्र या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मासाठी मोठ्या अडचणी समोर आल्या आहेत. गेल्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या दुखापग्रस्त झाला होता तो हा सामना खेळणार नाही. पांड्याच्या जागी प्लेईंग ११मध्ये स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव अथवा इशान किशन यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.
यातच खबर आली आहे की सरावादरम्यान स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवही दुखापतग्रस्त झाला आहे. तर इशानला मधमाशीने डंख मारला आहे. या दोन्ही बातम्यांनी भारतीय संघाला डबल झटका दिला आहे. जर सूर्या आणि इशान आजच्या सामन्यासाठी फिट नसतील तर रोहितची डोकेदुखी नक्कीच वाढेल. कारण १५ सदस्यीय टीममध्ये कोणताही फलंदाज नाही जो पांड्याच्या जागेवर खेळू शकेल.
एकूण सामने ११६
भारताने जिंकलेत – ५८
न्यूझीलंडने जिंकलेत – ५०
अनिर्णीत – ७
बरोबरी- १
एकूण वनडे सामने – ८
भारताने जिंकलेले – ३
न्यूझीलंडने जिंकलेले – ५
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…