काठमांडू: भारत-नेपाळ सीमेवर भूकंपाचे धक्के जाणवले. याची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल इतकी आहे. भूकंपाचे हे झटके रविवारी सकाळी जाणवले. नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की रविवारी नेपाळमध्ये ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला.
या भूकंपाचे केंद्रबिंदू काठमांडूपासून ५५ किमी दूर पश्चिममध्ये धाडिंगमध्ये होता. धाडिंग जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्हाला खूप जोरात झटके जाणवले. काही लोक घरातून बाहेर आले.
दिल्ली-NCR जाणवले धक्के
आतापर्यंत या भूकंपामुळे कोणीही जखमी झाल्याचे वृ्त्त नाही. युरोपीय भूमध्यसागरीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की भूंकप १३ किमी खोल होता. हा झटका बागमती आणि गडकी प्रांतातील इतर जिल्ह्यांमध्ये जाणवले. सोबतच भूकंपाचे झटके दिल्ली एनसीआर क्षेत्रातही जाणवले.
गेल्या रविवारीही दिल्ली-एनसीआरमध्ये जाणवले होते भूकंपाचे धक्के
एक आठवड्याआधी दिल्ली एनसीआरमध्ये रविवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. दिल्लीसोबत नोएडा आणि गाझियाबादमध्ये धरती हलली होती. हरयाणाच्या काही भागांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. याआधी ३ ऑक्टोबरला राजधानी दिल्ली तसेच एनसीआरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते.