GST invoice scam : सीजीएसटी मुंबई दक्षिण आयुक्तालयाने २६३ कोटी रुपयांचा बनावट जीएसटी इनव्हॉइस घोटाळा उघडकीस, एकाला अटक

Share

मुंबई : सीजीएसटी मुंबई दक्षिण आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी २६३ कोटी रुपयांचा बनावट जीएसटी इनव्हॉइस घोटाळा (GST invoice scam) उघडकीला आणला असून यात ७.६६ कोटी रुपयांच्या बनावट जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) इनपुट टॅक्स क्रेडिटचा समावेश आहे. याप्रकरणी मे. श्री बालाजी गोल्डच्या मालकाला अटक करण्यात आली आहे.

प्रधान मुख्य आयुक्त, सीजीएसटी मुंबई क्षेत्र यांच्या अध्यक्षतेखाली, केंद्रीय गुप्तवार्ता एकाकाकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सीजीएसटी मुंबई दक्षिण आयुक्तालयाच्या करचुकवेगिरी-विरोधी शाखेने तपास सुरू केला होता. केंद्रीय गुप्तवार्ता एककाकडून प्राप्त गोपनीय माहितीच्या आणि इतर माहितीच्या आधारे, मालाचा प्रत्यक्ष पुरवठा न करता पावत्या जारी करून बनावट आयटीसी मिळवणे आणि मंजूर करणे, या संदर्भात मे. श्री बालाजी गोल्ड विरोधात तपास सुरू करण्यात आला.

फर्मच्या व्यवसायाच्या प्रमुख ठिकाणाहून कोणतेही कायदेशीर व्यवसाय करण्यात आले नसल्याचे, मेसर्स श्री बालाजी गोल्डच्या नोंदणीकृत परिसरात घेतलेल्या शोधमोहिमेत आढळून आले.

फर्मचा मालक 19.10.2023 रोजी तपासात सामील झाला. त्याची साक्ष नोंदवण्यात आली. त्यामध्ये त्याने या कर फसवणुकीत आपला हात असल्याचे कबूल केले. या फर्मने मालाचा पुरवठा न करता 7.66 कोटी रुपयांच्या आयटीसीसह 263 कोटी रुपयांच्या बनावट पावत्यांवर फसवून इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त केल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी सीजीएसटी कायदा, 2017 च्या तरतुदींचे गंभीर उल्लंघन करून, प्रत्यक्षात माल प्राप्त न करता फसव्या पद्धतीने, अस्वीकार्य इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविण्यासाठीच्या बोगस पावत्या प्राप्त करण्यात आल्या होत्या.

तपासादरम्यान मिळालेले प्रत्यक्ष पुरावे आणि या करफसवणुकीत सहभागी असल्याची आरोपीची कबुली या आधारे आरोपीला, सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 132 चे उल्लंघन केल्याबद्दल 20.10.2023 रोजी सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 69 अंतर्गत अटक करण्यात आली. त्याला अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, एस्प्लेनेड यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

संभाव्य फसवणूक करणाऱ्यांना ओळखण्यासाठी आणि शोधण्यासाठी सीजीएसटी अधिकारी डेटा विश्लेषण साधनांचा वापर करत आहेत. हे प्रकरण सीजीएसटी मुंबई क्षेत्राने करचुकवेगिरी करणारे आणि बनावट आयटीसी नेटवर्कच्या विरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग आहे. करचोरी करणाऱ्यांविरुद्धची ही मोहीम सीजीएसटी अधिकारी येत्या काही दिवसात अधिक जोरदारपणे राबवणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

सक्शन पंपात बिघाड, कांदिवली तुंबली!

मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या…

43 mins ago

CM Eknath Shinde : गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही…

1 hour ago

ST Bus : मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा ठप्प! जाणून घ्या एसटी बस कुठून व कधी सुटणार?

हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा मुंबई : मुंबईत काल…

1 hour ago

Navi Mumbai news : धावत्या लोकलमधून महिला पडली! जीव वाचला पण गुडघ्यापासून दोन्ही पाय तुटले

मुसळधार पावसामुळे घडली दुर्दैवी घटना मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन…

2 hours ago

Mumbai Railway stations : मुंबईच्या रेल्वे स्थानकांबाबत आज विधानपरिषदेत होणार महत्त्वाचा ठराव!

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Sessions) आज एक महत्त्वाचा ठराव मांडला जाण्याची…

2 hours ago

Mumbai rain : मुसळधार पावसामुळे दुसर्‍या सत्रातही शाळा, महाविद्यालये बंद!

मुंबई महानगरपालिकेचा आदेश मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन सुरु आहे.…

3 hours ago