गणेश केदारे
मनमाड : नांदगाव शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात धान्य दुकानदार धान्य वितरण करताना मोठा गैरव्यवहार करत असून ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात जनतेने तक्रारीचा पाढाच वाचला आहे. नांदगाव तहसीलमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी येऊनही त्याची सार्वजनिक वितरण अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारे दखल घेतली जात नाही.यामुळे नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे. पुरवठा अधिकारी या गैर प्रकाराकडे अजाणतेपणे दुर्लक्ष करीत असल्याने या गैरव्यवहाराला नांदगाव तालुका सार्वजनिक वितरण व्यवस्थेचाच पाठिंबा असल्याची भावना लाभार्थी बोलून दाखवीत आहेत. या काळाबाजाराकडे दैनिक प्रहारने लक्ष वेधले असता तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी अशा रेशन चोरांना धडा शिकवला जाईल, अशी प्रतिक्रिया दिली.
नांदगाव तालुक्यात रेशनचा काळाबाजार सुरु असतांना तालुका पुरवठा विभागातील अधिकारी मात्र हाताची घडी तोंडावर बोट ठेऊन उघड्या डोळ्यांनी हा सारा गैर प्रकार पाहत आहेत. धान्य वितरणाविषयी विचारणा केली असता कुणीही अधिकारी यासंदर्भात समर्पक उत्तर देत नाही. या प्रश्नाला जाणीवपूर्वक बगल दिली जात आहे. असे नागरिकांचे म्हणणे असून नांदगाव तहसीलचे तहसीलदार मोरे व पुरवठा अधिकारी यांनी या गोष्टीची त्वरित दखल घेऊन धान्य पुरवठ्यात होणारा भ्रष्टाचार त्वरित थांबवावा अशी मागणी जनसामान्यांकडून केली जात आहे.
तालुक्यासह ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात मजुरी करून आपल्या व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांची संख्या प्रचंड आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर या कुटुंबांचा खरा अधिकार असतांना हे लाभार्थीच रेशन पासून वंचित ठेवले जात आहे. मग या कुटुंबांनी उदरनिर्वाह कसा करायचा? हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या धान्य पुरवठ्यातील ही अनियमितता तात्काळ थांबवावी, खऱ्या लाभार्थींना याचा लाभ मिळावा व होणाऱ्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी जनसामान्यांनी लावून धरली आहे.
“नांदगाव तालुक्यासह ग्रामीण भागामध्ये धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याचे दैनिक प्रहारने निदर्शनास आणून दिले. मतदार संघासाठी हा गंभीर विषय आहे. जो कोणी गरीबाच्या रेशनवर डल्ला मारीत असेल, दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल.” -आमदार सुहास कांदे, नांदगाव विधानसभा मतदारसंघ
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…