मुंबई: कोरोनाचा काळ संपला आहे. मात्र त्यानंतरही कर्मचारी मात्र ऑफिसला जाण्यास तयार नाही. मात्र आता अॅमेझॉनने(amazon) ऑफिसला न येणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कडक पावले उचलली आहेत. अॅमेझॉनने म्हटले की जे कर्मचारी ऑफिसला येणार नाही त्यांचा जॉब जाऊ शकतो. कंपनीने मेपासून कर्मचाऱ्यांना कमीत कमी तीन दिवस ऑफिसला येण्यास सांगितले आहे. मात्र अद्यापही कर्मचारी या नियमाचे नीट पालन करत नाही आहेत. हे पाहता अॅमेझॉनने आता आपला नियम अधिक कडक केला आहे.
अॅमेझॉनकडून रिटर्न टू ऑफिस पॉलिसी जारी करण्यात आली आहे जे कर्मचारी ही पॉलिसी फॉलो करणार नाहीत त्यांना नोकरीवरून काढून टाकले जाऊ शकते.
इनसाईडरच्या रिपोर्टनुसार कंपनीने मॅनेजर्सला त्यांच्या कर्मचाऱ्यांना काढण्याबाबतही सूट दिली आहे. कंपनीच्या गाईडलाईननुसार जे कर्मचारी आठवड्यातून तीन दिवस ऑफिसला येण्याचा नियम पाळणार नाहीत त्यांच्याविरोधात हे पाऊल उचलले जाईल. कंपनीने जागतिक स्तरावर हा नियम जारी केला आहे.
ऑफिसला न येणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगेचच कामावरून काढले जाणार नाही. कंपनीने मॅनेजर्सला ३ स्टेप प्रोसेस फॉलो करण्यास सांगितले आहे. पहिल्या स्टेपमध्ये मॅनेजरला आपल्या कर्मचाऱ्यांशी खाजगीत बातचीत करावे
लागेल.
याशिवाय दुसऱ्या स्टेपमध्ये मॅनेजरला कर्मचाऱ्यासोबत एक अथवा दोन आठवड्याच्या आत मीटिंग फिक्स करावी लागेल. या मीटिंगनंतर कर्मचाऱ्याला ऑफिसला परतण्याबाबत इशारा दिला जाईल.
जर या दोन स्टेपनंतरही कर्मचारी ऑफिसला येत नसेल तसेच त्याचे ऑफिसला न येण्याबाबतचे खरे कारण समोर येत नसेल तर मॅनेजरला तिसरी स्टेप फॉलो करावी लागेल.
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…