
नवी दिल्ली: देशाला पहिली रॅपिड ट्रेन(Rapid train) लवकरच मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २० ऑक्टोबरला रॅपिड रेल्वेचे उद्घाटन करील. ते सकाळी ११.१५ वाजता साहिबाबादमध्ये रॅपिड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. केंद्र सरकारने या रॅपिडेक्स ट्रेनचे नाव बदलून नमो भारत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धाटन झाल्यानंतर २१ ऑक्टोबरपासून या रेल्वेमध्ये सामान्य प्रवासी प्रवास करू शकतात.
दिल्ली-गाझियाबाद-मेरठ कॉरिडोरच्या १७ किमी लांबीचा प्राथमिक खंड सुरू केला जाईल.
पहिल्या फेजमध्ये दिल्ली-गाजियाबाद-मेरठ कॉरिडोरच्या १७ किमी लांबीचा प्राथमिक खंड सुरू केला जाईल. या कॉरिडोरची एकूण लांबी ८२ किमी आहे. यात १४ किमीचा भाग दिल्लीत आहे अजून ६८ किमीचा भाग उत्तर प्रदेशात आहे. यात दिल्ली मेट्रो विविध लाईन्सना जोडले जाईल. हा मार्ग अलवर, पानिपत आणि मेरठसारख्या विविध शहरांना दिल्लीशी जोडला जाईल.
पहिल्या टप्प्यानंतर हा प्रोजेक्ट दुहाई येथून मेरठपर्यंत वाढवला जाईल. मेरठ साऊथपर्यंत दुसऱ्या टप्प्यात काम होईल. तिसऱ्या टप्प्यात साहिबाबाद ते दिल्ली यांच्यातील काम पूर्ण होईल. २०२५मध्ये रॅपिड रेल दिल्ली ते मेरठदरम्यान धावताना दिसेल. हा प्रवास अवघ्या ५५ मिनिटांत पूर्ण होईल.
६० मिनिटांत १०० किमींचा प्रवास
आरआरटीएस रेल्वेंना १८० किमी प्रति तासाच्या गतीने चालण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. दरम्यान, या रेल्वे रूळावर १६० किमी प्रति तासच्या वेगाने धावतील. ही रेल्वे ६० मिनिटांत १०० किमीचा रस्ता पूर्ण करेल. ६ कोच असलेल्या या ट्रेनचा लूक बुलेट ट्रेनप्रमाणे आहे.