चंद्रपूर : शिवसेना व ठाकरे गटातील (Shivsena Vs Thackeray Group) संघर्ष सुरु झाल्यापासून आमदार अपात्रतेचा (MLA Disqualification) प्रश्न प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) या प्रकरणाचा निकाल लावण्याचे काम विधानसभा अध्यक्षांच्या हाती सोपवले आहे. मात्र, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी सुनावणीसाठी तयार केलेले वेळापत्रक कोर्टाने काही त्रुटींमुळे मान्य केले नाही आणि सुधारित वेळापत्रक तयार करण्यासाठी ३० ऑक्टोबर ही अंतिम तारीख दिली आहे. दरम्यान, आज राहुल नार्वेकर देवीच्या दर्शनासाठी गेले असता ‘महाराष्ट्राला न्याय देण्याची बुद्धी मला प्राप्त होवो’, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
चंद्रपुरातील महाकाली महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला राहुल नार्वेकर उपस्थित होते. यावेळी आमदार अपात्रता प्रकरणी कोर्टामधील सुनावणीबाबत त्यांनी भाष्य केलं. आमदार अपात्रतेचा विषय न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे त्यावर चर्चा करणं योग्य होणार नाही, योग्य वेळी निर्णय घेऊ, असं राहुल नार्वेकर म्हणाले.
राहुल नार्वेकर पुढे म्हणाले, ‘चंद्रपुरातील जनतेने आणि सर्व प्रतिनिधींनी जो सुंदर महोत्सव आयेजित केला आहे, त्या ठिकाणी देवीचं दर्शन घेण्याकरता आम्ही आलो आहोत. मी देवीचरणी प्रार्थना करुन सद्बुद्धीची मागणी करेन. महाराष्ट्राला न्याय देण्याची बुद्धी मला प्राप्त होवो, अशी मागणी मी करणार आहे’.
राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाकडून आमदार अपात्रतेच्या प्रकरणात ३० ऑक्टोबर ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे तोपर्यंत तरी या निकालासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. या सुनावणीत नेमकं काय होणार, अध्यक्ष नवं वेळापत्रक सादर करणार का, याकडे संपूर्ण राज्याचे डोळे लागून राहिले आहेत.
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…