World Cup 2023 : नेदरलँडच्या विजयानंतर बदलला पॉईंट्स टेबलचा खेळ, पाहा टीम इंडिया कुठे

मुंबई: विश्वचषकातील(world cup 2023) सामने दिवसेंदिवस अधिकच रोमहर्षक होत चालले आहेत. तसेच पॉईंट्स टेबलचाही खेळ बदलत आहे. टीम इंडियाने(team india) आपले सुरूवातीचे ३ सामने जिंकल्यामुळे ते पॉईट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहेत तर न्यूझीलंडही आपले तीन सामने जिंकत दुसऱ्या स्थानावर आहे. विश्वचषकातील १५व्या सामन्यात या स्पर्धेतील दुसरा धक्कादायक निकाल पाहायला मिळाला.


श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियासारखे मजबूत संघाना एकतर्फी हरवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला मंगळवारी नेदरलँड या छोट्या संघाने तगडा धक्का दिला. या निकालाचा परिणाम पहिल्या चार संघावर झाला नाही मात्र तळात असलेल्या नेदरलँडने ऑस्ट्रेलियाला धक्का देत खाली पाठवले.


द. आफ्रिकेला हरवत नेदरलँडने पॉईंट्स टेबलमध्ये केवळ खातेच खोलले नाही तर ८वे स्थान मिळवले. तर ऑस्ट्रेलियाला नवव्या स्थानावर ढकलले. कारण नेट रनरेटच्या तुलनेत नेदरलँड ऑस्ट्रेलियापेक्षा सरस आहे.



श्रीलंका सगळ्यात तळाशी


पॉई्ंट्स टेबलमध्ये श्रीलंका हा एकमेव देश आहे ज्यांचे अद्याप विश्वचषकात विजयी खाते उघडलेले नाही. कारण त्यांच्या संघाने अद्याप एकही सामना जिंकलेला नाही. यामुळे श्रीलंका सगळ्यात खालच्या स्थानावर आहे. पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर द. आफ्रिका आहे तर पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे. गतविजेता इंग्लंड या यादीत ५व्या स्थानावर आहे तर अफगाणिस्तान ६व्या, बांगलादेश ७व्या आणि नेदरलँड्स ८व्या तर ऑस्ट्रेलिया ९व्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा संघ दहाव्या स्थानावर आहे.


आता विश्वचषकातील १६वा सामना आज न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळवला जाणार आहे. पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंड दुसऱ्या तर अफगाणिस्तान पाचव्या स्थानावर आहे. नुकताच अफगाणिस्तानच्या संघाने गतविजेत्या इंग्लंडला पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे न्यूझीलंड संघालाही त्यांच्यापासून जरा बचके राहत खेळ करावा लागेल.


Comments
Add Comment

शुभमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर! 'या' खेळाडूकडे नेतृत्वाची जबाबदारी

मुंबई : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. ईडन गार्डनवर झालेल्या

स्मृती मानधना-पलाश मुच्छल लग्नाची 'ही' तारीख पंतप्रधानानीचं केली उघड

मुंबई : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबतची चर्चा अनेक दिवसापासून रंगत होती. मात्र आता त्यांच्या

आज भारत-बांगलादेश सामना; टॉस, वेळ आणि लाइव्ह स्ट्रीमिंग अपडेट

मुंबई : भारत आणि बांगलादेश यांच्यात आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेतील सेमी फायनलचा पहिला सामना २१नोव्हेंबर रोजी

भारताच्या लेकींची सुवर्ण हॅटट्रिक!

जागतिक बॉक्सिंग कप : मीनाक्षी, प्रीती आणि अरुंधतीचा 'गोल्डन पंच' नवी दिल्ली : जागतिक बॉक्सिंग कपच्या अंतिम फेरीत

द. आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत भारताचे नेतृत्व पंत की राहुलकडे?

दुखापतीमुळे कर्णधार शुभमन गिलवर टांगती तलवार मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी

शुभमन गिल बाहेर; साई सुदर्शनला मिळणार कसोटीची संधी

गुवाहाटी : पहिल्या कसोटी दरम्यान झालेल्या गंभीर दुखापतीनंतर शुभमन गिलची मैदानात पुनरागमन करण्याची शक्यता कमी