मुंबई : ससून ड्रग्ज रॅकेट (Sassoon Drugs racket) प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील (Lalit Patil) गेले अनेक दिवस फरार होता. पुण्यात पोलिसांच्या नजरकैदेतून सुटून तो पळाला होता, त्यामुळे पोलिसांना न्यायालयाने चांगलेच फटकारले होते. मात्र, मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पुन्हा एकदा सापळा रचून ललित पाटीलला त्यात अडकवत कामगिरी फत्ते केली आहे. फरार ललितला चेन्नईच्या एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई साकीनाका पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ललित पाटील हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या मोठ्या ड्रग सिंडिकेटचा एक भाग आहे. ड्रग सिंडिकेट त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. स्थानिक पातळीवर पोलीस आणि डॉक्टरांचे घट्ट जाळे ललित पाटीलने स्वतःच्या बचावासाठी विणले होते. त्यातूनच मलेशिया आणि थायलंड सारख्या देशांमध्ये त्याने मेफेड्रोन पाठवल्याचे समोर आले होते. ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत करण्यात राजकीय नेत्याचा हात होता असा आरोप करण्यात आला होता. राजकीय पुढाऱ्याच्या आशीर्वादानेच ललित पाटीलला ससूनच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे म्हटले जात होते. त्याला वाचवण्यासाठी एवढे प्रयत्न होत असताना साकीनाका पोलिसांनी अत्यंत गुप्ततेने सापळा रचत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पुण्यातील ससून रुग्णालयातून ललित पाटील पसार झाला होता. त्यानंतर तो उत्तर प्रदेशमार्गे नेपाळला गेल्याचे सांगण्यात आले. पुणे पोलिसांची शोध पथके ललितच्या मागावर होती. पुणे पोलिसांसह मुंबई पोलीसही ललितच्या शोधात होती. ललित पाटीलला पळून जाण्यासाठी एका बडा नेत्याचा हात असल्याचे आरोप होत होते. सत्ताधारी आणि विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू होते. या दरम्यान ललित पाटील मात्र एका ट्रॅव्हल कंपनीच्या कारने त्याच्या दोन सहकाऱ्यांसह आधी गुजरात, धुळे मग कर्नाटक आणि नंतर बंगळूरूला पोहोचला.
ललित पाटील याचा भाऊ आणि मेफेड्राँन बनविणारा भूषण पाटील व अभिषेक बलकवडे या दोघांना पुणे पोलिसांनी १० ऑक्टोबरला नेपाळ बाँर्डरवर पकडले. याची कुठलीही खबर माध्यमांना लागू दिली नाही. पोलिसांच्या अटकेत असलेल्या या आरोपीलाच ललित पाटीलचा एका नव्या नंबरवरून फोन आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी व्यक्तीला ललित पाटीलशी बोलायला सांगितले. ललितने तो कशा रितीने फरार झाला, कुठून कसा गेला हे सांगितले. या आरोपीशी त्याचा फोनवरुन अधूनमधून संवाद होत होता. त्यानुसार मुंबई पोलिसांनी पाठलाग करून ललित पाटीलला चेन्नईतून अटक केली. ललितचा हा एक फोन कॉल त्याला चांगलाच महागात पडला.
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…