फरार ललित पाटीलचा नाशिकच्या महिलेकडे मुक्काम…

Share

महिलेकडून सात किलो चांदी जप्त, महिलेच्या घरी आर्थिक देवाण घेवाण

नाशिक प्रतिनिधी: नाशिक शहरात सुरु असलेले अंमली पदार्थ विक्रीची साखळी तोडण्यासाठी शहर पोलिसांनी कंबर कसली असून यावर्षी आतापर्यंत विक्रीसंदर्भात १०, सेवन करण्या संदर्भात ५, तर कोटपा अंतर्गत ३५७ गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिस उपायुक्त  प्रशांत बच्छाव यांनी माध्यमांना दिली. या संदर्भात माहिती देतांना पोलिस आयुक्त म्हणाले की, गुन्हे विरोधी पथकाने कारवाईमध्ये सातत्य ठेवुन अंमली पदार्थांची विक्री करणारे व्यक्तींची धरपकड करून कारवाया केलेल्या आहेत. त्यामध्ये सन २०२३ मध्ये अंमली पदार्थ बाळगणे व खरेदी विक्री संदर्भाने १० गुन्हे व अंमली पदार्थ सेवन करण्याच्या ०५ व शाळा / महाविदयालय परिसरात सार्वजनिक ठिकाणी तंबाखुजन्य पदार्थ विक्री व सेवन करणा-या इसमांवर कोटपा कायदयाअंतर्गत ३५७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सध्या अंमली पदार्थ विरोधी पथक नाशिक रोड, इंदिरा नगर या पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांचा कसोशीने तपास करीत असून नाशिकरोडच्या साडे बारा ग्रॅम एमडीच्या गुन्ह्यात तीन आरोपी अटक केल्यानंतर त्यांनी दिलेल्या कबुली नंतर आणखी चार आरोपी ताब्यात घेतले. तर नाशिकरोडच्या चार किलो आठशे सत्तर ग्रॅम एमडीच्या गुन्ह्यात तीन आरोपी निष्पन्न झाले असून या गुन्ह्यात सात किलो चांदी हस्तगत करण्यात आली आहे. तर इंदिरानगरच्या ५४.५ ग्रॅम एमडीच्या गुण्यात एका महिलेसह तीन जणांना अटक करण्यात आली असून इतर दोन आरोपी निष्पन्न झाले आहेत. निष्पन्न आरोपीच्या शोधासाठी एकूण सहा पथके तयार करण्यात आली असून अटक आणि निष्पन्न आरोपिंचा तपास पुर्ण करून या रॅकेटच्या मुळाशी जाण्याचा प्रयास आहे.

ललित पाटील फरार असतांना नाशिक शहरातील एका महिलेकडे एक दिवस वास्तव्यास राहून आर्थिक देवाण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकने त्या महिलेच्या घर झडतीत सात किलो चांदी मिळून आली. ललित या महिलेकडून २५ लाख रुपये रोख घेऊन गेल्याचे निष्पन्न झाले असून अधिक चौकशीसाठी त्या महिलेला पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. दरम्यान ही रक्कम ललितचा भाऊ भूषण याने दिल्याचे महिलेने सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Recent Posts

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सेलिब्रिटींचा संताप..

मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…

4 minutes ago

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

1 hour ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

2 hours ago

चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…

2 hours ago

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

3 hours ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

4 hours ago