Wednesday, May 14, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

विरोधकांनी आयुष्यभर विकासकामात अडथळे आणण्याचेच काम केले, वडखळ माजी सरपंच राजेश मोकल यांचा विरोधकांवर निशाणा

विरोधकांनी आयुष्यभर विकासकामात अडथळे आणण्याचेच काम केले, वडखळ माजी सरपंच राजेश मोकल यांचा विरोधकांवर निशाणा

पुणे व खारघर येथे राहणाऱ्यांनी आम्हाला राजकारण व समाजकारण शिकवू नये


पेण(देवा परवी): विकासात्मक दृष्टिकोनातून कोणतेही काम करायचे नाही आणि जे करतात त्या विकासकामात अडथळे आणायचे असे धंदे विरोधकांनी आयुष्यभर केले असल्याचे पेण तालुक्यातील श्रीमंत वडखळ ग्राम पंचायतीचे माजी सरपंच राजेश मोकल यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर निशाणा साधला.

माजी पंचायत समिती सदस्य तथा आत्ताच्या सरपंच पदाच्या उमेदवार पुजा राजेश मोकल यांचे शिक्षणच या गावात झाले आहे, त्यामुळे या गावाची त्यांना जाण आहे. त्यांनी केलेल्या चांगल्या कामांमुळे सन २००५ मध्ये त्या पेण पंचायत समितीच्या सदस्या बनल्या. त्या नंतर मी सरपंच असताना देखील त्यांनी माझ्या सोबत राहुन धोरणात्मक काम काय असतं हे पाहिले असल्याने प्रशासन कसे चालवायचे याचा त्यांना दांडगा अनुभव आहे.


त्यामुळे वडखळ ग्रुप ग्राम पंचायतीच्या येत्या थेट सरपंच पदाच्या निवडणूकीत पुजा राजेश मोकल आणि श्री क्षेत्रेश्र्वर विकास आघाडीचे सर्व सदस्य निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. विरोधक जाणुन बुजुन नको ते आरोप करत आहेत. यांनी विनाकारण अडथळे निर्माण केले आणि गावचा विकास कसा थांबेल याचे प्रयत्न केले, मात्र त्यात ते अयशस्वी ठरले आणि यापुढे देखील त्यांना अपयशच येईल असे देखील माजी सरपंच राजेश मोकल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शेवटी बोलताना पुणे व खारघर येथे राहणाऱ्यांनी आम्हाला राजकारण व समाजकारण शिकवू नये असाही टोला लगावला.

Comments
Add Comment