Fire: तामिळनाडूत फटाक्यांच्या दोन कंपनीत भीषण आग, ११ जणांचा मृत्यू

चेन्नई: तामिळनाडूमध्ये मंगळवारी १७ ऑक्टोबरला दोन फटाका कंपनीत झालेल्या स्फोटानंतर लागलेल्या आगीत होरपळून तब्बल ११ लोकांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत. हे अपघात रंगपालयम आणि किचनायकनपट्टी गावात झाले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना ३-३ लाखांची मदत केली. तसेच जखमींना एक-एक लाख रूपये मदतीची घोषणा करण्यात आली.


पोलिसांच्या माहितीनुसार रंगपायमच्या फटाका कंपनीत स्फोटानंतर आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, फायर ब्रिगेडचे कर्मचारी तसेच बचाव पथक दाखल झाले. येथील मलब्यातून ७ जळालेले मृतदेह हाती घेण्यात आले. यांची ओळख अद्याप झालेली नाही.


दरम्यान, या आगीनंतर तीन जण गंभीर जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरा अपघात किचनायकनपट्टी गावातील फटाका कंपनीत झाला. येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर दोन महिला कामगारांना वाचवण्यात यश आले. त्यांना उपचारासाठी श्रीविल्लीपुत्तूर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


याआधी ९ ऑक्टोबरला सोमवारी तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यातील विरागलूरमध्ये फटाका कंपनीत आग लागली होती. या दुर्घटनेत ९ लोकांचा मृत्यू झाला होता तर ५ जण जखमी झाले होते.

Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व