Ashish Shelar : बाळासाहेबांच्या सुपुत्राने काय करुन दाखवलं?

Share

‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ म्हणणारे उद्धव ठाकरे आता म्हणू लागले ‘गर्व से कहों हम समाजवादी हैं’

आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर कडक शब्दांत टीका

मुंबई : काँग्रेससोबत (Congress) जाण्यापेक्षा मी माझं दुकान बंद करेन आणि शरद पवारांना (Sharad Pawar) मैद्याचं पोतं म्हणत शेवटपर्यंत ज्वलंत हिंदुत्वाचे विचार मांडणा-या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या सुपुत्राने काँग्रेस, राष्ट्रवादी, लालू प्रसाद, स्टॅलिन पासून आता समाजवाद्यांसोबत हातमिळवणी करुन हिंदुत्वाला तिलांजली देण्याचं काम करुन दाखवलं, अशी उपहासात्मक टीका करत भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आतापर्यंतच्या भूमिकांवर कडक शब्दांत फटकारले आहे.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल समाजवादी पक्षाशी (Samajwadi Party) युती केली. बाळासाहेबांनी कायम ज्या पक्षांना आपला विरोध दर्शवला त्यांच्यासोबतच उद्धव ठाकरेंनी हातमिळवणी केली. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आहोत असं मिरवणारे उद्धव ठाकरे किती खरे राहिले आहेत याची काल प्रचिती आली. यामुळे सत्ताधारी पक्षांकडून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. ‘अन्न भेसळीप्रमाणे यांच्या हिंदुत्वात मिलावट आहे’, अशी बोचरी टीका काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली. तर आता आशिष शेलार यांनीदेखील उद्धव ठाकरेंवर कडक शब्दांत टीका केली आहे.

आमदार आशिष शेलार यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन एक पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने काय काय करुन दाखवलं? असा सवाल उपस्थित करत त्यांनी लिहिले आहे, उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो सांगितले आणि स्वतःच मुख्यमंत्री होऊन दाखवलं!, श्रीमती सोनिया गांधी, शरद पवार यांच्या सोबत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावून दाखवले!, राम मंदिरावर टीका करुन दाखवली!, हिंदू सणांवर बंदी आणून दाखवली!, छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागून दाखवले!, छत्रपतींच्या वाघ नखांबाबत प्रश्न चिन्ह निर्माण करुन दाखवले!, वंदनीय बाळासाहेबांनी आयुष्यभर ठाकरी फटकारे मारले त्या काँग्रेस, राष्ट्रवादी, लालू प्रसाद, स्टॅलिन पासून आता समाजवाद्यांसोबत सुपुत्राने जाऊन दाखवलं!, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

पुढे शेलार यांनी लिहिले आहे, ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ म्हणणारी शिवसेना आता ‘गर्व से कहों हम समाजवादी हैं’ म्हणू लागली..! भविष्यात कदाचित ‘गर्व से कहो हम MIM हैं’ सुध्दा म्हणू लागतील! अशा शब्दांत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना चपराक लगावली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

2 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

2 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

2 hours ago

राखी वटवट्या

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…

2 hours ago

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

3 hours ago

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

3 hours ago