Mumbai airport news : मुंबई विमानतळ उद्या सहा तासांसाठी बंद; काय आहे कारण?

मुंबई : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) १७ ऑक्टोबरला ६ तासांसाठी बंद (Mumbai Airport Shut) ठेवण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजल्यापासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विमानतळ बंद असणार आहे. या सहा तासांदरम्यान मुंबई विमानतळावरून कोणतंही उड्डाण होणार नाही.


छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (CSMIA) वार्षिक प्रतिबंधात्मक देखभालीसाठी हे विमानतळ उद्या सहा तासांसाठी तात्पुरतं बंद करण्यात येणार आहे. या ठिकाणच्या दोन्ही धावपट्टीवर देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.


अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावरील या नियोजित तात्पुरत्या बंदचा प्राथमिक उद्देश विमानतळाच्या पायाभूत सुविधा सुधारून त्यांचा सर्वोत्तम दर्जा राखणे आहे. या काळात आवश्यक असलेली दुरुस्ती आणि देखभाल कामे करण्यात येतील. यासंबंधी एअरमेन, एअरलाइन्स आणि इतर संबंधितांना सहा महिने अगोदर नोटीस जारी करण्यात आली आहे.



निवेदनात काय म्हटले आहे?


विमानतळ ऑपरेटरच्या निवेदनानुसार सांगण्यात आलं आहे की, 'सीएसएमआयएच्‍या (CSMIA) पावसाळ्यानंतरच्या सर्वसमावेशक धावपट्टी देखभाल योजनेचा एक भाग म्हणून, दोन्ही रनवे RWY 09/27 आणि RWY 14/32 हे १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० ते १७:०० वाजेपर्यंत तात्पुरते नॉन-ऑपरेशनल राहतील.' निवेदनात पुढे म्हटलं आहे की, 'सीएसएमआयए (CSMIA) ने सर्व महत्त्वाच्या विभागांच्या सहकार्याने देखभालीचं काम सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी प्रभावीपणे उड्डाणे निर्धारित केली आहेत. सीएसएमआयएला प्रवाशांकडून सहकार्य आणि पाठिंबा अपेक्षित आहे."



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

BMC Election Result 2026 : मुंबईत 'महायुती'चा झंझावात! भाजप-शिंदे गटाने गाठलं 'शतक'; महापालिकेत सत्तांतराचे स्पष्ट संकेत

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आज मोठा उलटफेर पाहायला

Mumbai BMC Election Results 2026 LIVE Counting : मतमोजणीच्या अडीच तासांनंतर 'हे' उमेदवार ठरले विजयी; पाहा विजयी उमेदवारांची पहिली यादी

वॉर्ड २ – तेजस्वी घोसाळकर (भाजप) वॉर्ड १९ – प्रकाश तवडे (भाजप) वॉर्ड २० – दीपक तवडे (भाजप) वॉर्ड 36 – सिद्धार्थ

Tejasavee Ghosalkar : दहिसरमध्ये तेजस्वी घोसाळकरांचा 'महाविजय'! उबठाच्या धनश्री कोलगेंचा दारुण पराभव; मुंबईत भाजपची मुसंडी

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपने दहिसरच्या बालेकिल्ल्यात भगवा फडकवला आहे. प्रभाग

BMC Election 2026 : मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजप-शिंदे गटाची जोरदार मुसंडी! भाजप ११, तर शिंदे गट १० जागांवर आघाडीवर

११४ च्या मॅजिक फिगरकडे महायुतीची वेगाने वाटचाल मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा 'किल्ला' काबीज करण्यासाठी मैदानात

मुंबईत मतमोजणीला सुरुवात, अशी सुरू आहे मतमोजणी ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के

मुंबई मनपासाठी ५२.९४ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के