Shardiye Navratri 2023: शारदीय नवरात्रौत्सवाला आजपासून सुरूवात

मुंबई: अश्विन शुक्ल पक्षातील शारदीय नवरात्रौत्सवाला(Shardiye Navratri 2023) आजपासून प्रारंभ होत आहे. यावेळेस नवरात्रौत्सवाला १५ ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे. तर २४ ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी याचे समापन होईल. घटस्थापनेच्या दिवशी देवीच्या नावाने कलशाची स्थापना केली जाते.


नवरात्रीत अनेकजण नऊ दिवसांचा उपवास करतात. हे नऊ दिवस अतिशय चैतन्याने आणि उत्साहाने सळसळणारे असे असतात.



जाणून घ्या काय आहे घटस्थापनेचा मुहूर्त


नवरात्रीत घटस्थापना पहिल्या दिवशी प्रतिप्रदेला केली जाते. घटस्थापना अभिजीत मुहूर्तावर करणे शुभ मानले जाते. हा मुहूर्त १५ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांपासून ते १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत आहे. तुम्ही या ४६ मिनिटांच्या कालावधीत घटस्थापना करू शकता.



असे आहेत नवरात्रीचे हे नऊ दिवस


रविवार १५ ऑक्टोबर - देवी शैलपुत्री(पहिला दिवस)
सोमवार १६ ऑक्टोबर - देवी ब्रम्हचारिणी(दुसरा दिवस)
मंगळवार १७ ऑक्टोबर - देवी चंद्रघंटा(तिसरा दिवस)
बुधवार १८ ऑक्टोबर - देवी कुष्मांडा(चौथा दिवस)
गुरूवार १९ ऑक्टोबर - देवी स्कंदमाता (पाचवा दिवस)
शुक्रवार २० ऑक्टोबर - देवी कात्यायनी(सहावा दिवस)
शनिवार २१ ऑक्टोबर - देवी कालरात्री(सातवा दिवस)
रविवार २२ ऑक्टोबर - देवी महागौरी(आठवा दिवस)
सोमवार २३ ऑक्टोबर - महानवमी (नववा दिवस)
मंगळवार २४ ऑक्टोबर - दुर्गा मातेचे विसर्जन(दहावा दिवस, दशमी)

Comments
Add Comment

मुंबईच्या मतदारयादीत ११ लाख दुबार मतदार

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बेस्ट भरती करणार ५०० वाहक

मुंबई : दिवसेंदिवस कमी होत चाललेली कर्मचाऱ्यांची संख्या व सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांवर येणारा अतिरिक्त ताण

आयआयटी मुंबईत पहिल्या वर्षासाठी मानसिक आरोग्य अभ्यासक्रम अनिवार्य

मानसिक आरोग्यावर आधारीत अभ्यासक्रम लावणारा मुंबई आयआयटी पहिलाच मुंबई : आयआयटी मुंबईने आपल्या पहिल्या वर्षातील

वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमचे १९-२० डिसेंबरला मुंबईत आयोजन

जगभरातील अग्रणी उद्योगपती, व्यावसायिक आणि विचारवंत यांना एकत्र आणणारे व्यासपीठ मुंबई : वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक

अंधेरी एमआयडीसीमध्ये रासायनिक गळती

एकाचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर मुंबई : अंधेरी (पूर्व) येथील एमआयडीसी परिसरातील भंगारवाडी येथे शनिवारी

शीळफाटा येथे उड्डाणपुलाच्या कामानिमित्त निळजे-दातिवलीदरम्यान ब्लॉक

मुंबई : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन प्रकल्पासाठी शीळ फाटा येथील उड्डाणपूल हटविण्याच्या कामासाठी,