मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) काल मध्यरात्री एक भीषण अपघात (Accident) झाला. देवदर्शन करून परतत असलेल्या भाविकांवर काळाचा घाला घातला गेला. हे भाविक सैलानी येथील दर्ग्यावरून परतत होते. त्या दरम्यान समृद्धी महामार्गावरील वैजापूरच्या जांबरगाव टोलनाक्याजवळ ट्रॅव्हल्स बस आणि ट्रक यांच्यात मोठा अपघात झाला. या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला तर २३ जण जखमी झाले आहेत. या घटनेवर शोक व्यक्त करत राज्य सरकार व पंतप्रधान कार्यालयाने मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या अपघाताचे कारण सांगत दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
आज ठाण्यात मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाबाबत माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आमच्या कॅबिनेटमधील मंत्री दादा भुसे, संदीपान भुमरे, तसेच अतुल सावे, रमेश बोरनारे यांनी आज घटनास्थळी भेट दिली, तसेच जखमींची विचारपूसही केली. या घटनेबाबत मी पोलीस महानिरीक्षकांशी, तिथल्या पोलीस अधीक्षकांशी बोललो. मी त्यांना याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. तसेच जखमींवरील उपचारांचा खर्च आपलं सरकार करेल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
या अपघातातील जखमी प्रवाशांनी दावा केला आहे की आरटीओ अधिकाऱ्यांनी एक ट्रक थांबवला होता. हा ट्रक रस्त्याकडेला उभा होता. ट्रकचालक तिथून ट्रक काढत असताना टेम्पो ट्रॅव्हलरने मागून धडक दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील जखमी प्रवाशांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, अपघाताच्या प्राथमिक पाहणीनुसार, आरटीओने ट्रक थांबवला होता. त्या ट्रकला ही टेम्पो ट्रॅव्हलर गाडी धडकली. यामध्ये आरटीओचे अधिकारी किंवा ट्रकचा चालक जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली असून जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने या घटनेची दखल घेत अपघातातील मृतांच्या कुटुबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीद्वारे प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली आहे.
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…