Falguni Pathak Garba : फाल्गुनी पाठकच्या गरबा कार्यक्रमाच्या पासेसचे आमिष दाखवून १५६ तरुणांची फसवणूक

पाच लाख रुपये उकळले...


मुंबई : आजपासून नवरात्र (Navratri) सुरु झाली आहे आणि ठिकठिकाणी गरबा, दांडिया अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून प्रसिद्धीच्या झोतात आलेली गरबा सेलिब्रिटी फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) हिच्या गरबा कार्यक्रमांची क्रेझ वाढत चालली आहे. तिच्या कार्यक्रमांना प्रचंड गर्दी पाहायला मिळते तर त्यांचे पासेसही महाग असतात. मात्र, अशाच एका कार्यक्रमाचे पासेस देतो असं सांगून १५६ तरुणांना फसवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यातून या तरुणांना तब्बल पाच लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. यासंबंधी एका तरुणाने तक्रार केली असून पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.


याप्रकरणी फाल्गुनी पाठक यांच्या दांडिया कार्यक्रमाचे आयोजक आणि तिकीट डिलर विशाल शहा यांनी त्यांच्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, मुंबईतील बोरिवली वेस्टमध्ये दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी ३ हजार ३०० हा किमान तर ४ हजार ५०० अशा मोठ्या किंमतीचे पास ठेवण्यात आले होते. एक तरुण आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांनी काही जणांकडून जास्त पैसे घेऊन त्या दांडिया कार्यक्रमात प्रवेश देण्याचे अमिष दाखवले होते. त्या तरुणांनी बाकींच्याकडून पैसे घेऊन १५६ पास देण्याचे कबूलही केली होती. मात्र त्यानंतर पास न मिळाल्यानं संबंधित तरुणांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. एका वीस वर्षीय तरुणानं याबाबत कांदिवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



नेमकं काय घडलं?


बोरिवली येथील फाल्गुनी पाठकच्या कार्यक्रमाचा अधिकृत विक्रेता असल्याचा दावा करणारा विशाल शाह स्वस्तात पासेस देत असत्याची माहिती कांदिवलीतील एका तरूणाला मिळाली. शाहकडून या कार्यक्रमाचा पास ४,५००० रुपयांऐवजी ३,३०० रुपयांना मिळणार असल्याचे तक्रारदाराला समजले. त्यामुळे तक्रारदार तरूण व त्याचे मित्र पास खरेदी करण्यासाठी तयार झाले. त्यांनी इतर मित्रांनाही विचारणा केली.


अखेर तक्रारदारासह १५६ जण पास खरेदी करण्यास तयार झाले. त्यानुसार तक्रारदार आणि त्याच्या दोन मित्रांनी सर्वांकडून रोख रक्कम गोळा केली. त्याबाबतची माहिती शहाला देण्यात आली होती. त्यानुसार शहाने तिघांना न्यू लिंक रोड, बोरिवली (पश्चिम) येथे गुरूवारी पोहोचण्यास सांगितले. तिथे शहाचा एक माणूस पैसे घेऊन त्यांना पास देणार होता. शहाच्या सूचनेनुसार तिघे तरुण त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी एका व्यक्तीकडे पैसे दिले. नंतर शहाने त्यांना योगी नगर येथील पत्ता दिला आणि तेथे पोहोचून पास घेण्यास सांगितले. तिघेही मित्र योगी नगर येथे पोहोचले असता त्यांना सांगितलेली इमारत सापडलीच नाही. त्यामुळे तब्बल पाच लाख रुपये त्यांना गमवावे लागले आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड

मुलुंड पूर्व आणि पश्चिममधील नाने पाडा नाल्यावरील पुलांची पुनर्बांधणी

मुंबई : पूर्व उपनगरातील मुलुंड पश्चिममधील नानेपाडा नाल्यावरील पूल पाडून त्याठिकाणी नव्याने पुनर्विकास केला

भायखळ्यात इमारत खोदकामादरम्यान माती कोसळली

दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू मुंबई  : भायखळा पश्चिमेकडील हंस रोड परिसरात हबीब मेंशन इमारतीच्या पुनर्विकासाचे

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी

राणीबागेत बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी) : निसर्गसौंदर्य आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईकरांना अनुभवायला